तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 18 November 2019

ट्रक-जिपच्या अपघातात एकजन गंभिर जखमी
प्रतिनिधी
पाथरी:-पाथरी-माजलगाव राष्ट्रीय महामार्गावर ढालेगाव नजीक ट्रक आणि पिकअप जिपचा समाेरा समाेर अपघात झाल्याने पिकअप चालकाच्या डाेक्याला गंभिर दुखापत झाली असून जखमी चालकाला बीड येथे उपचारा साठी दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
मंगळवार १९ नाेव्हेंबर राेजी पहाटे चार  सुमारास पाथरी हून माजलगाव कडे जाणारी पिकअप जिप क्र एम एच ४६ ई ३०३४ आणि माजलगाव कडून पाथरी कडे येणारा ट्रक क्र एमएच २२ एए ८४८५ यांचा समाेरा समाेर अपघात झाल्याने पिकअप चालक जरीमाेद्दीन पठाण यांच्या डाेक्याला गंभिर दुखापत झाली. जखमी पठाण यांना त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने बीड येथील रुग्नालयात दाखल केल्याची माहिती ढालेगाव येथील नारायण आतकरे यांनी दिली. हा अपघात ढालेगाव पासून अर्धा किमी अंतरावर तुळजाभवानी हॉटेल समाेर घडला. पहाटेच्या सुमारास माेठे धुके पडलेले हाेते त्यातच ट्रकचालक स्वत:ची बाजू साेडून ट्रक चालवत हाेता. असे अपघात स्थळावरील दृष्या वरून लक्षात येते. अपघात हाेताच ट्रक चालक फरार झाला असून दाेन्ही वाहाने  उभी असल्याने वाहतुकीला बराचकाळ अडथळा निर्माण झाला हाेता. या अपघातात पिकअप च्या पुढील भागाचे माेठे नुकसान झाले आहे.

No comments:

Post a comment