तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 23 November 2019

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी उत्सव सोहळ्याचे आयोजन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
 येथील संत सोपान काका महाराज मंदिरात उद्या सोमवार दिनांक 25 रोजी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यानिमित्त ह-भ-प विश्वंभर महाराज उखळीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी या समाधी उत्सव सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संत सोपान काका उखळीकर फडाच्या  वतीने करण्यात आले आहे.

 दरम्यान प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संत जगमित्र नागा मंदिर शेजारी असलेल्या संत सोपान काका मंदिरात सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर 2019 रोजी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त सकाळी 10 ते 12 वाजताच्या दरम्‍यान हभप विश्वंभर महाराज उखळीकर यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर गोपीनाथ रामभाऊ शंकुरवार माणिकनगर परळी वैजनाथ यांच्या तर्फे हे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परळी पंचक्रोशीतील भाविकांनी या ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी उत्सव सोहळ्यात उपस्थित राहावे. असे आवाहन हभप उत्तम महाराज उखळीकर, ह भ प विठ्ठल महाराज उखळीकर, ह-भ-प विश्वंभर महाराज उखळीकर आणि ह भ प दीनानाथ महाराज उखळीकर यांनी केले आहे.

No comments:

Post a comment