तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 November 2019

सरकारचं चुकीचं धोरण,हेच शेतकर्‍याचं सरण आणी मरण!पिकनुकसानीमुळे शेतकरी हवालदिल

सरकारची मदतीसाठी कासवगती

फुलचंद भगत
वाशिम-जिल्ह्यातील  शेतकऱ्यांच्या पिकाचे विदारक दृश्य बघता तात्काळ आर्थिक मदत देऊन ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी प्रशासनाकडे केली परंतु सरकारचे ऊदासिन धोरण हेच शेतकर्‍याचं सरण आणी मरण ठरत असुन नुकसानीचे पिक पंचनाम्याची शासनाची कासवगती शेतकर्‍यांना अधिकच चिंतेत टाकत आहे.
          वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील परिसरात अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे. पोटच्या मुलांपेक्षाही जास्त जपलेल्या, हातातोंडाशी आलेली शेतामधील पिके नेस्तनाबूत होताना शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यांनी बघावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून हृदय पिटाळून आकांत करीत आहे.शासनाने त्वरीत ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जोर धरत आहे. मतदारसंघातील नेते,पुढारी शेतकऱ्यांना धीर देत शासनाकडून आर्थिक मदत मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत. संपूर्ण मतदार संघातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पिक पाहणी ते करीत आहेत. पीक पाहणी करीत असताना संबंधित अधिकाऱ्यांना योग्य तेच सूचना देऊन शेतकऱ्यांसोबत मानवतेच्या भावनेतून कार्य करण्याचे आवाहन सुद्धा करीत आहेत.
 अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर समस्यांचे डोंगर उभे ठाकले आहे.अशा परिस्थितीचा गांभीर्याने सामना करण्याचे आव्हान सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत हे शेतकऱ्यांना करीत आहेत.वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यामधील गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामा करणे अधिकार्‍यांनी  सुरु  केले आहे. पिक पाहणी करतांना शेतकर्‍यांच्या डोळ्यातील आसवं आणी मनातला हूंदका ओळखला तर नुकसानीची तिव्रता शासनाच्या लक्षात येईल.खरच या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना वेळीच मदत शासनाने द्यावी शासनाचे ऊदासिन धोरण हेच शेतकर्‍याचं सरण आणी मरण ठरेल असे म्हणने वावगे ठरणार नाही अशी भावनिक प्रतिक्रीया शेतकरी वर्गातुन होत आहे.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

No comments:

Post a Comment