तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 November 2019

दिवाळीच्या सुट्टी मध्ये घरी गेलेल्या शिक्षकांच्या घरावर चोरट्यानी केले हात साफ

मोताळा शहरातील प्रभाग क्र ,१३ मधील घटना 

मोताळा :-(जावेद खान)  दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने आपल्या कुटूंबासह मूळ गावी गेलेल्या शिक्षकाच्या घरावर चोरट्याने हाथ साफ केल्याची घटना मोताळा शहरातील प्रभाग क्र १३ येथे घडली असुन शिक्षक अफरोज खान अहमद खान वय ३६ वर्ष यांनी  दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे 
             या बाबत सविस्तर पणे वृत्त असे की जवाहर उर्दू हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अफरोज खान अहमद खान वय ३६ वर्ष हे दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने आपल्या कुटूंबासह दिनांक २३ऑक्टोबर रोजी आपल्या मूळ गावी मोहाळा ता आकोट जिल्हा अकोला गेले होते दरम्यान आज दिनांक ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास माझ्या घराशेजारी राहणारे राजु खान यांनी कॉल करून सांगितले की तुमच्या घराच्या दरवाज्याच्या कोंडा कोण्ही तरी तोडला आहे अशी माहिती दिली 
           सुमारे ११:३० वाजेच्या सुमारास मोताळा येथे येऊन पाहिले असता घराच्या समोरच्या दरवाज्याच्या कोंडा तोडलेला तर घरात जाऊन बघितले असता आतील दरवाज्याचे कोडे तोडलेले दिसले व घरात असलेले लोखंडी कपाटा चे दरवाजा उघडा असल्याचे दिसले व कपाटातील कपडे अस्थावेस्थ अवस्थेत घरात फेकलेले होते दरम्यान कपाट मध्ये ठेवलेली नगदी २५००० रु रक्कम पत्नीचा सोन्याच्या चपळा हार वजन अंदाजे १५ ग्रॅम किंमत अंदाजे ३५००० रु एक सोन्याची अंगठी किंमत अंदाजे २००० रु हातातील चांदीचे कडे वजन १५ ग्रॅम अंदाजे किंमत १५००० रु असा एकूण ७७००० रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने चोरला असल्याच्या शिक्षक अफरोज खान अहमद खान वय यांनी  दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध बोराखेडी पोलिसांनी अप क्रमांक ३७६ /१९ कलम ४५४,४५७,३८०  नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक माधवराव गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली ए एस आय गजानन वाघ करीत आहे.

No comments:

Post a comment