तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 November 2019

समृद्धी साठीचे नियमबाह्य गौण खनिज उत्खनन बद्दल लवकरच चौकशी होणार -उपविभागीय अभिकारी गणेश राठोड.
डोणगाव येथील शेतकरी पुत्र मनोज श्रीराम नव्हाळे यांनी यांनी दिलेल्या तक्रारीची घेतली जिल्हाधिकारी यांनी दखल.

डोणगांव १७ 
मेहकर तालुक्यातील ग्राम डोणगाव येथील श्रीराम नव्हाळे यांची शेती भाग ३ मध्ये शेत सर्वे नंबर ३५५ मध्ये असून   त्यांच्या शेजारील जमीन समृद्धी साठी गौण खनिज काढण्या साठी दिली मात्र शेत तळ्याच्या नावावर खूप मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या खोदकामा मुळे शेजारील शेती ढासळण्याची भीती असल्याने शेतकरी पुत्राने इच्छामरण मागितले होते त्यावर जिल्हा अधिकारी यांनी चौकशी समिती स्थापन झाल्याची माहिती उप विभागीय अधिकारी यांनी दिली.
      डोणगाव येतथिल शेतकरी पुत्र मनोज श्रीकृष्ण नव्हाळे यांनी दीड महिन्या अगोदर एक निवेदन दिले होते त्याची दखल घेतली गेली नाही तेव्हा त्यांनी ८ नव्हेम्बर रोजी पुन्हा तहसीलदार मेहकर यांच्या मार्फत एक निवेदन देऊन समृद्धी साठी शेततळ्याच्या नावाखाली सुरू असलेले अवैध उत्खनन सुरू असून या  उत्खनने भविष्यात शेती ढासळून उपासमारीची वेळ येईल तर दुसरीकडे ब्लास्टिंगणे शेतातील बोअर बंद पडला   तेव्हा नियम बाह्य उत्खनन थाबवा व त्याची चौकशी करून कार्यवाही करा असा निवेदन दिल्यावर जिल्हा अधिकारी यांनी त्याची दखल घेऊन चौकशी समिती स्थापन करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले या समितीत सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता,उप विभागीय अधिकारी,भूमी अभिलेख अधिकारी व इतर अधिकारी वर्ग राहणार आहे अशी माहिती  डोणगाव येथे समस्या निवारण पाहणी साठी आलेल्या उप विभागीय अधिकारी यांनी दिली.


जमील पठाण
8805381333

No comments:

Post a comment