तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 November 2019

बाबरी मस्जिद व राममंदिराच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्व धर्मीय शांतता बैठक संपन्न....

गोरख पवार वैजापूर औरंगाबाद..

वैजापूर तालुक्यातील विरगाव पोलीस स्टेशन मध्ये आज ईद, बाबरी मस्जिद व राममंदिराच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्व धर्मीय शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.कोणीही अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन या वेळी डी वाय एस पी रांजणकर यांनी केले.सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन आपण कामे करणार आहोत दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी,असे काही आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी या वेळी सांगितले.

या वेळी विरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके ,पी एस आय नागटीळक,गोपनीय शाखेचे दीपक बर्डे,माजी बांधकाम सभापती व जिल्हा परिषद सदस्य अशोक गलांडे,विरगावचे सरपंच नानासाहेब थोरात,कृष्णा पाटील, विरगाव हद्दीतील पोलीस पाटील,सर्व पोलीस कर्मचारी व मोठ्या संख्येने सर्व समाज बांधवांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment