तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 November 2019

मित्र मंडळाच्या माध्यमातून समाज कार्याला प्राधान्य देणार


अरुणा शर्मा


पालम :- नवनिर्वाचित आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाच्या माध्यमातून तालुक्यातील समाज कार्याला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन पालम पूर्णा येथील संपर्क प्रमुख तथा प्रभारी म्हणून निवड झालेले पालम पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष माधवराव गायकवाड यांनी पालम येथील दि. 8 नोव्हबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केले यावेळी राजेभाऊ फड, किसनराव भोसले, नंदकुमार पटेल, रामजी लटके, सुनिल भाऊ मुंढे, संदीप पाटील, साहेबराव सुरनर, भगवानराव सिरस्कर, नारायण दुधाटे, तहेर खा पठाण आदी उपस्थित होते. पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की नवनिर्वाचित आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या माध्यमातून पालम पूर्णा गंगाखेड या तिन्ही तालुक्यातील विकासाला प्रथम प्राधान्य देऊन समाजकार्याच्या माध्यमातून या तीनही तालुक्यात काम करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असून राजकारण माध्यमातून समाज कार्याला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगीतले  गायकवाड यांचे पालम, गंगाखेड व पूर्णा तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी सत्कार केला यावेळी विनायक पोळ, गणेश दुधाटे, माधव दुधाटे, नवनाथ पोळ, मारुती शेंगुळे, शिवराम पैकी, ताहेर खा पठाण, बालासाहेब कुरे,  बाळासाहेब कराळे, भागवत किरडे, बालाजी कराळे, पिरखा पठाण, हनुमंत शेट्टे, धनंजय कदम, नवनाथ भुसारे, विजय एकलारे , मारुती मोहिते,  गजानन माने, गणेश गाढवे, दीपक आवरगंड, गणेश कदम, चंद्रकांत पोळ, रफिक खा पठाण, शेख असलम, आकाश अहिरे, प्रकाश डाले, हरी सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a comment