तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 25 November 2019

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेची तहसील कार्यालयावर निदर्शने निसर्गाच्या संकटात बळीराजाचा अंत पाहू नका- व्यंकटेश शिंदेवैजनाथ (प्रतिनिधी) :-  परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाली यामुळे बळीराजा संकटात सापडला असून त्या नुकसानीची भरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासाठी शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी निदर्शने करून निवेदन देण्यात आले. 
        शेतकऱ्यांचे कैवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्क प्रमुख आनंद जाधव यांच्या आदेशावरून जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी, बीड जिल्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना २५ हजार नुकसानीची भरपाई द्यावी, कसलेही निकष न लावता सरसकट विमा वाटप करण्यात यावा,  शेतकऱ्यांचे सरसकट वीज बिल माफ करावे, शेतकऱ्यांच्या पाल्ल्याना शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी बी-बियाणे मोफत वाटप करावे या मागण्यासाठी परळी तालुका शिवसेनेच्या वतीने निदर्शने करून निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, शहर प्रमुख राजेश विभूते, जिखा सहसंघटक रमेश चौंडे, युवासेना तालुका समन्वयक संतोष चौधरी, उपशहर प्रमुख मोहन राजमाने, युवा शहर अधिकारी कृष्णा सुरवसे,उपतालुका प्रमुख पप्पू नाटकर, विध्यार्थी सेना शहर संघटक गजानन कोकीळ, अश्रोबा काळे, कैलास कावरे, तुकाराम नरवाडे, अनिल शिंदे, विकास पवार, योगेश सातपुते, वैजनाथ सलगर, विष्णू सलगर, संजय सोमाणी, अक्षय राऊत, अक्षय गायकवाड, दिलीप कुरील, विशाल देशमुख, संदीप शिंदे, अतुल शिंदे, आकाश आंबीलवादे, विजय गायकवाड, शाम शिंदे, गौरव क्षीरसागर, रोहित पंजरकर, अमर शिंदे, सदानंद धुळे, बालाजी सातपुते, पांडुरंग मोरे, जगदीश मुंडे, बालाजी राठोड, जगदीश सातपुते, निलेश दोडके, मधुसूदन शिंदे, ज्ञानेश्वर सातपुते, अनिल सातपुते, बालाजी पवार, संकेत सातपुते यांच्या सह असंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते.

No comments:

Post a comment