तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 26 November 2019

प्रत्येक भारतीयाने संविधान साक्षर व्हावे- ॲड.दत्तात्रय आंधळे


 वैजनाथ (प्रतिनिधी) :- संविधानाची साक्षरता हि देशाला मजबूत बनविण्यासाठी अत्यंत निकडीचे असून प्रत्येक भारतीयाने संविधान साक्षर व्हावे असे आवाहन ॲड.दत्तात्रय आंधळे यांनी केले. 
                  परळीवैजनाथ येथील मराठवाडा पब्लिक स्कुल आणि वैद्यनाथ नर्सिंग काॕलेज संयुक्तरित्या आयोजित दिनांक २६नोव्हेंबर२०१९ रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वैद्यकिय व्यवसायात व शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेले डाॕ.सुर्यकांत मुंडे साहेब होते. अध्यक्षिय समारोपात डाॕ. मुंडे म्हणाले की विध्यार्थांनी देश व समाज घडवण्यासाठी त्यांच्या वर भविष्यात जबाबदारी येणार असून प्रत्येक विध्यार्थांमध्ये उद्याचा नेता व सजग नागरिक दडलेला आहे.यावेळी प्राचार्य शेख सर,श्री सतिश सर ,शेख सर ,श्रीमती परळीकर मॕडम,नायर मॕडम,कांदे मॕडम तसेच इतर शिक्षक मंडळी तसेच विध्यार्थांची लक्षणीय उपस्थिती होती .शिस्तप्रीय संस्था म्हणून या महाराष्ट्र पब्लिक स्कुलचा नावलौकीक प्राप्त झालेला आहे .अध्यक्षीय समारोप डाॕ.सुर्यकांत मुंडे यांनी केला तर आभार प्रदर्शन प्राचार्यशेखसर यांनी केले .

No comments:

Post a comment