तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 25 November 2019

उद्या वंचित बहुजन आघाडी व बौद्ध महासभेच्या वतीने संविधान दिनानिमित्त भव्य रॅली व सभेचे आयोजन .उपस्थित राहण्याचे जिल्हा नेते प्रशांत वाघोदे  यांचे आव्हान ...

मोताळा :-  दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा वंचित बहुजन आघाडी तथा भारतीय बौद्ध महासभेच्या मोताळा तालुका शाखेच्या यांच्या संयुक्त विद्यमानाणे 26 नोव्हेंबर मंगळवार ला संविधान गौरव दिवस म्हणुन साजरा करण्यात येणार आहे.
     26 नोव्हेंबर हा दिवस देशभर संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतअसुन भारताच्या इतिहासात 26 नोव्हेंबर या दिवसाला ऐतिहासिक असे महत्व आहे कारण आजच्या दिवशी 70 वर्षांपूर्वी 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली होती. आणि 26 जानेवारी 1950 पासून घटना अंमलात आणण्यात  आली होती शेकडो वर्षांची गुलामगिरी, हजारो वर्षांच्या जातियतेत अडकलेला भारत, लोकशाही प्रजासत्ताक बनलं. सामान्य माणसाला घटनेनं नवं आत्मभान दिलं. स्वातंत्र्य, समता,बंधुता आणि न्याय या राज्यघटनेतील तत्वांमुळं भारतीय राज्यघटना जगात सर्वश्रेष्ठ समजली जाते म्हणून आजचा हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो
     म्हणून वंचित बहुजन आघाडी तथा भारतीय बौद्ध महासभा मोताळा तालुका शाखेच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 11 वाजता जिल्हा नेते  प्रशांत वाघोदे यांच्या नेतृत्वात सालाबादप्रमाणे  भव्य अश्या रॅलीचे तथा संविधान सभेचे आयोजन करण्यात आले आहे सदरच्या रॅली ला स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथुन सुरवात होणार असुन शहरातील विविध मार्गाने भ्रमण करीत बस स्थानक चौक येथे रॅलीची सांगता करण्यात नंतर बस स्थानक चौक येथे संविधान सभेचे आयोजन करण्यात आले असुन या सभेला वंचित बहुजन आघाडी चे तथा भारतीय बौद्ध महासभेचे मान्यवर मंडळी मार्गदर्शन करणार असुन तालुक्यातील नागरिकांनी सदरच्या रॅली व सभे करीता मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान जिल्हा नेते प्रशांत वाघोदे व तालुका अध्यक्ष शेख रफिक शेख नईम यांनी केले आहे.

No comments:

Post a comment