तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!



tej news

Friday, 1 November 2019

गोदाकाठ' केंद्र शासित प्रदेश करा.. आठ गावातील नागरिकांची राज्यपालांकडे मागणी




प्रतिनिधी
सोनपेठ:- तालुक्यातील गोदाकाठच्या आठ गावांनी राज्यपालांकडे ही गावे केंद्र शासित प्रदेश म्हणून जाहीर करावीत म्हणून एका निवेदनाद्वारे केली आहे. 
सोनपेठ तालुक्यातील आठ गावांनी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मतदानावर बहिष्कार घातला होता. या बहिष्कारकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने गावातील नागरीकांनी असमाधान व्यक्त केले होते. गोदाकाठच्या काही युवकांनी तर रस्ता होईपर्यंत लग्न न करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. ऐन दिवाळीत पडलेल्या पावसामुळे गोदाकाठच्या ही आठ गावे संपर्क क्षेत्राबाहेर होती. अनेकांना तर दिवाळीला गोदाकाठावरील आपल्या गावातही जाता आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या गोदाकाठच्या नागरीकांनी राज्यपालांनाच थेट पत्र लिहून गोदाकाठच्या लासीना, थडी उक्कडगाव, वाडी पिंपळगांव, थडी पिंपळगाव, गंगापिंपरी, गोळेगाव, लोहिग्राम, खरपी तांडा या आठ गावांना केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यासाठी केंद्र शासनाला प्रस्ताव देण्याची मागणी केली आहे. तसेच या मागणीसाठी या आठही गावात ग्रामसभा घेऊन एकमुखी ठराव घेण्यात येणार आहे. व दि. ०७ नोव्हेंबर रोजी गंगापिंपरी येथे या आठ गावातील नागरिकांची जनसंसद घेण्यात येणार आहे. 
याबाबतचे एक निवेदन तहसीलदार डॉ.आशिष बिरादार याना देण्यात आले असून या निवेदनावर कृष्णा पिंगळे, अनिल रोडे, नारायण निर्मळ, अर्जुन रोडे, बाबासाहेब जाधव माऊली रोडे सतीश भंडारे, सतीश रोडे तुकाराम परांडे, गणेश रोडे, गणेश परांडे, नंदकिशोर रोडे, प्रकाश ढाकणे, उद्धव रोडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 
फोटो: गोदाकाठच्या आठ गावांना केंद्र शासित प्रदेश म्हणून जाहीर करण्यासाठी प्रशासनाला निवेदन देताना नागरिक दिसत आहेत

No comments:

Post a Comment