तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 26 November 2019

विश्वासदर्शक ठराव उद्याचं घ्या, गुप्त मतदान नको : सुप्रीम कोर्टाचा निर्णय


बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई (दिल्ली),दि.२७ : महाराष्ट्र विधानसभेत उद्या म्हणजे बुधवारी २७ नोव्हेंबर रोजी विश्वासदर्शक ठराव घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या तडकाफडकी शपथविधीनंतर ते आपलं बहुमत सिद्ध करू शकतील का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उद्यापर्यंत सर्व आमदारांचा शपथविधी व्हावा आणि मग विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडला जावा, असं सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एन.व्ही.रामण्णा यांनी निर्णयाचं वाचन करताना सांगितलं. या फ्लोर टेस्टदरम्यान गुप्त मतदान व्हायला नको, सगळ्या प्रक्रियेचं चित्रीकरण व्हावं, असंही कोर्टाने म्हटलं आहे.

यापूर्वी राज्यपालांनी फडणवीस-अजित पवार यांच्या सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. मात्र त्यांच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सुप्रीम कोर्टात दाखल केली होती.

त्यावर दोन दिवस झालेल्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने आज हा निर्णय दिला.

दुसरीकडे, महाविकास आघाडीने सोमवारी संध्याकाळी १६२ आमदारांची ओळख परेड मुंबईच्या हयात हॉटेलमध्ये घेतली. तसंच त्यापूर्वी तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी जवळजवळ सर्व सह्या असलेलं पत्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे देऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे.

सकाळी ११:२० वाजता - बहुमत सिद्ध करून दाखवू - चंद्रकांत पाटील

"उद्या विधानसभेत आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करू," असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

सकाळी ११:१५ वाजता: फडणवीस यांनी राजीनामा द्यावा - काँग्रेस

"सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. संविधान दिनी, सर्वोच्च न्यायालयाने लोकशाही मूल्यांचं रक्षण करणारा निर्णय दिला आहे. सत्तेसाठी भाजपची अगतिकता उद्यापर्यंत संपुष्टात येईल. बेकायदेशीर पद्धतीने मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा," असं काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

सकाळी ११:०० वाजता: सत्य मेव जयते - शिवसेना

"राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी मिळून याचिका दाखल केली होती. आम्ही सर्वोच्च न्यायालयाला धन्यवाद देऊ इच्छितो. या निर्णयाबाबत समाधानी आहोत. संविधान दिनी सरकारस्थापनेसंदर्भात योग्य निर्णय," असं शिवसेना नेते गजाजन कीर्तीकर यांनी सांगितलं.

"सत्य मेव जयते" असं ट्वीट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.

"प्रोटेम स्पीकरची नियुक्ती व्हावी. नवनियुक्त आमदारांना शपथ देण्यात यावी. गुप्त मतदान पद्धतीने होऊ नये. लोकशाही तत्त्वांची पायमल्ली होऊ नये. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, सामान्यांना न्याय मिळावा यासाठी आमची विनंती होती. संविधान दिनी, लोकशाही मूल्यांचा विजय झाला आहे. उद्या जल्लोष असेल, १६२ चा आकडा उद्या वाढलेला असेल," असं शिवसेना खासदार अनिल देसाई म्हणाले.  

"घोडेबाजार रोखण्यादृष्टीने न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. लोकशाहीची बूज राखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. प्रोटेम स्पीकरला घटनात्मक चौकटीनुसार कार्यवाही करावी लागेल. विधानसभा निवडणुकांची अध्यक्ष गुप्त मतदान पद्धतीने निवडला गेला असता तर विश्वासदर्शक ठरावाची प्रणाली बदलली जाऊ शकत होती," असं अनिल परब यांनी सांगितलं.

सकाळी १०:४० वाजता: सुप्रीम कोर्टाचा आदेश - उद्या विधानसभेत विश्वासदर्शकप्रस्ताव घ्या

न्या.रामण्णा यांच्याकडून निकालाचं वाचन सुरू.

लोकशाही मूल्यांचं रक्षण होणं आवश्यक. नागरिकांना स्थिर सरकार मिळणं हा अधिकार. याचिकेच्या सुनावणीदरम्यान अनेक प्रश्न उपस्थित झाले. 

आपण उत्तराखंड, बोम्मई, जगदंबिका पाल खटल्यांचा अभ्यास केला आहे. घोडेबाजार रोखण्यासाठी कारवाई आवश्यक. 

२७ नोव्हेंबरला विश्वासदर्शक ठराव व्हावा, प्रोटेम स्पीकरची नियुक्ती व्हावी, असे निर्देश.

गुप्त मतदान व्हायला नको. सगळ्या प्रक्रियेचं चित्रीकरण आणि प्रसारण व्हावं. उद्यापर्यंत सर्व आमदारांचा शपथविधी व्हावा आणि मग विश्वासदर्शक ठराव

उद्या बुधवारी पाच वाजेपर्यंत आमदारांचे शपथविधी व्हावेत, नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होण्याची गरज नाही. प्रोटेम स्पीकर आमदारांना शपथ देतील.

सदनातील सगळ्यात वरिष्ठ व्यक्तीला प्रोटेम स्पीकर म्हणून निवडलं जातं. सभागृहाचा सर्वाधिक काळ सदस्य राहिलेल्या व्यक्तीला प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्त केलं जातं.

सकाळी १०:३० वाजता: सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू

सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू. फडणवीस-अजित पवार सरकारचा निर्णय थोड्याच वेळात येणार.

सकाळी ९:५० वाजता: व

No comments:

Post a comment