तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 26 November 2019

संविधान दिनानिमित्त मंत्रालयात उद्देशिकेचे सामूहिक वाचन


बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई, दि. : भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयामध्ये आज भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करुन संविधान दिन साजरा करण्यात आला. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासमवेत उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी उद्देशिकेचे वाचन केले.

सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस व्ही आर. श्रीनिवास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, कोकण विभागीय आयुक्त  शिवाजी दौंड, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव (रवका) अंशू सिन्हा, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेशकुमार वाघमारे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.अन्बलगन, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज. जी. वळवी, राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव राजेंद्र गायकवाड यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a comment