तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 2 November 2019

धर्मापुरी येथे संत माधव बाबा पालखी पायदिंडीचे स्वागतपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे श्री गुरु सिद्धाग्नी संत माधवबाबा यांच्या मोळवण ते पंढरपूर पालखी पायी दिंडीचे दि. ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी भाविकांनी स्वागत केले. 
    गत १५ वर्षांपासून निघणारी ही दिंडी श्री क्षेत्र पंढरपूर येथे ७ नोव्हेंबरला पोहोचणार आहे. प्रत्येक गावी ही दिंडी मुक्कामी पोहोचत आहे. धर्मापुरी येथे दिंडी आल्यानंतर सर्व भाविकांचे स्वागत करून पालखीचे पूजन करण्यात आले. या दिंडीमध्ये दिंडीप्रमुख विनायक महाराज मोळवणकर यांच्यासह अनेक गावातील वारकरी सहभागी झाले होते. या दिंडीचे स्वागत पांडुरंग फड, अमोल फड, निवृत्ती फड, प्रभाकर दहिफळे आदींनी करून भाविकांच्या भोजनाची व्यवस्था केली.

No comments:

Post a Comment