तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 November 2019

सेवानिवृत्तांनी निवृत्तीवेतनाबाबत अडचण असल्यास कोषागार कार्यालयाशी संपर्क करावा - जिल्हा कोषागार अधिकारी

   

- जिल्हा कोषागार कार्यालयात सेवानिवृत्तांचा मेळावा

बुलडाणा, दि. 6 -  राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना आपल्या निवृत्ती वेतनाबाबत अडचण येत असल्यास त्यांनी तात्काळा आमच्या जिल्हा कोषागार कार्यालयाशी, उपकोषागार कार्यालयांशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर यांनी केले आहे.
  जिल्हा कोषागार कार्यालयात राज्य शासकीय निवृत्ती वेतन धारक अथवा कुटूंब निवृत्ती वेतन धारकांचा मेळावा 5 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी अप्पर कोषागार अधिकारी संजय अंभोरे, निवृत्ती वेतन धारकांच्या कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष श्री. पऱ्हाड, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक श्री. सिन्हा, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक श्री. शेळके, अन्य अप्पर कोषागार अधिकारी उपस्थित होते.
   मेळाव्यात निवृत्ती वेतन धारकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच काही समस्या तात्काळा सोडविण्यात आल्या. यावेळी निवृत्ती वेतन धारकांच्या नियमित तक्रारी सोडविण्यासाठी कोषागार कार्यालयामध्ये स्वतंत्र तक्रार निवारण कक्षाचे उद्घाटन ज्येष्ठ निवृत्ती वेतन धारक श्री. इंगळे यांच्याहस्ते करण्यात आले. आभार प्रदर्शन श्री. भोलाने यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पंकज गवई, राहुल भोलाने, मयुरी लेकुरवाळे, शिवनारायण बारगजे, सविता आढाव, दिपाली वानखडे, दुर्गा चव्हाण व तृप्ती सरोदे आदी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. मेळाव्याला 150 निवृत्ती वेतन धारक उपस्थित होते.
   - - - - - - - - - - - - - - - - -
                                       
अल्पसंख्यांक खासगी व अपंग शाळांमध्ये पायाभूत
सुविधा पुरविण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित
बुलडाणा, दि. 6 : धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थीबहुल शासनमान्य खाजगी अनुदानीत, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगर परिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेअंतर्गत इच्छुक शाळांकडून अर्ज मागविण्याबाबत प्रस्ताव मागविण्यात येत आहे. शाळांनी 7 ऑक्टोंबर 2015 च्या शासन निर्णयामधील विहीत नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून प्रस्ताव  सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2019 होती. ती मुदत वाढविण्यात आली असून इच्छुक शाळांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 30 नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावे.
इच्छुक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांनी संपूर्ण भरलेला अर्ज अल्पसंख्यांक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे दि. 30 नोव्हेंबर, 2019 पर्यंत सादर करावे.  विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाही. अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment