तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 26 November 2019

पालम येथे संविधान दिना निमित्ताने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य वाटप
आरूणा शर्मा


पालम :- दि. 26 नोव्हेंबर रोजी ममता विद्यालया येथे संविधान दिन मोठया उत्स्फुर्त पणे साजरा करण्यात आला. भारताचे थोर विचारवंत व लेखक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन नगरअध्यक्ष जालिंदर हात्तिअंबिरे यांनी केले. व मान्यवरांनी संविधान दिन चे महत्व समजून सांगितले. व संविधान विषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृतीचा संदेश दिला. संविधान दिनानिमित्त पालम नगर पंचायतीचे नगरअध्यक्ष जालिंदर हत्तिअंबीरे यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहीत्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी आयोजक म्हणुन पालम नगर पंचायतचे      नगरअध्यक्ष जालिंदर हात्तिअंबिरे हे होते. तर कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर.के. क्षिरसागर प्रमुख पाहुणे म्हणुन निवृत्ती हात्तिअंबिरे जिल्हा अध्यक्ष रिपाई, नगरसेवक मोबिन खुरेशी, गफार खुरेशी, मंगेश जोंधळे, सामाजिक कार्यकर्ते कल्याण हनवते, पंकज हात्तिअंबिरे, सुरेश मोडके, गौतम हनवते, सुमेधबोधी वाघमारे, अरविंद थिट्टे, सचिन थिट्टे, प्रमोद येवले, गोपिनाथ शिदें व विद्यालयातील एस.जि. कानगुले, जि.डि. पौळ, एम एल. शिदे, एम.एस. येवले, बि.आर. आवरगंड, बि.एस. आचार्य, एस.एम. अंबुरे, ए. आर. खाडेकर, ए.एन. जामदे सर्व शिक्षक वृंद व मोठ्या संख्येत विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a comment