तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 15 November 2019

दी इंडिया सिमेंट लिमिटेड, कंपनी तर्फे इंदपवाडी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी    
 परळी वैजनाथ(प्रतिनिधी) :- तालुक्यातील इंदपवाडी येथील जिल्हा परिषद प्रा.शाळेत दि इंडिया सिमेंट कंपनीच्या वतीने दि.14 नोव्हेंबर रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व पंडित जवाहरलाल नेहरू (बालदिन)यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.
या वेळी शाळेतील विद्यार्थांना दि इंडिया सिमेंट कंपनीतर्फे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गावचे सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,शाळेचे शिक्षकवर्ग व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आपल्या गावातील शाळेत या,दोन महान व्यक्तिंची जयंती साजरी करून विद्यार्थांना शालेय साहित्याची भेट दि इंडिया सिमेंट कंपनीने दिल्या बद्दल गावचे सरपंच,शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व गावकऱ्यांनी कंपनीचे आभार मानले.

No comments:

Post a comment