तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 November 2019

वाशिम येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेशदिन साजरा

साहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचा पुढाकार

फुलचंद भगत
 वाशीम(प्रतिनिधी)दि 7  रोजी स्थानिक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे वतीने शाळा प्रवेश दिन साजरा करण्यात आला.                         कार्यक्रमाच्या सुरूवातीला पिरीपाचे जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे, राष्ट्रवादीचे सुनील पाटील, पिरूभाई बेनीवाले,प्रा. माधव डोंगरदिवे,पदवीधर संघटनेचे प्रविण पट्टेबहादूर,महेश खडसे, रुपेश राऊत, निलेश खडसे,संतोष सरकटे,इंगोले,सुभाष रोकडे,भगत,सुरेश भालेराव,शुभम ढाले अदिसह महिलांची उपस्थिती होती.उपस्थितांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.नंतर  सुरूवातीला उपस्थितीतांना माधव डोंगरदिवे यांनी त्रीशरण पंचशील घेतले.नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन राजकुमार पडघान यांनी तर मार्गदर्शन दौलतराव हिवराळे,सुनिल पाटील, प्रवीण पट्टेबहादूर यांनी केले.तर आभार प्रदर्शन माधव डोंगरदिवे यांनी केले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो. 8459273206,9763007833

No comments:

Post a Comment