तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 26 November 2019

पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालय नाथरा व इंदिरा बालसदन नाथरा येथे संविधान दिन अतिशय उत्साहात साजरापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-                 श्रीनाथ मानव सेवा मंडळ संचलित पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालय  नाथरा व इंदिरा बालसदन नाथरा येथे  संविधान दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.अशा संविधान दिनाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुलेखा मुंडे तसेच शाळेतील सर्व सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर  यांच्या प्रतिमेचे मंगल पूजन करून  करण्यात आली. त्यानंतर शाळेतील मुख्याध्यापिका, सर्व सहशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या भारत देशाच्या संविधाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करून संविधानाचे महत्व विशद करणाऱ्या घोषणा दिल्या.तदनंतर  शाळेतील विद्यार्थ्यांच्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या विषयावर वकतृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. समारोप कार्यक्रमात या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती  सुलेखा मुंडे व शाळेतील सहशिक्षक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेवटी 26-11 च्या  हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व  जवानांना श्रद्धांजली देऊन या संविधान दिनाची सांगता करण्यात आली.अशा या संविधान दिन कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाळेतील विद्यार्थिनी कु प्रांजल थोरात,वैष्णवी मुंडे व सेजल कराड यांनी केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षक संदीप सरांनी केले

No comments:

Post a comment