तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 November 2019

छायाचित्रकार शांतनु दास यांचे एक उत्कृष्ट पारसी कला क्षणांचे दर्शन जितेंद्र यांनी पाहिले
मुंबई (प्रतिनिधी) :- 
एक उत्साही कला संग्रहकर्ते, क्यूरेटर आणि उद्योजक परवेज दमानिया व शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि पारसी खाद्यप्रेमी असलेले फ्रावाशी शाळेचे रतन लूथ आयोजित 'पारसी - अ टाइमलेस लिगसी' या ताओ आर्ट गॅलरीत भरविण्यात आलेल्या फोटोग्राफी प्रदर्शनात प्रख्यात पुरस्कार प्राप्त छायाचित्रकार शांतनु दास यांनी त्यांच्या गोठविलेल्या कलाचौकटीत कैद केलेल्या पारसी समुदायाच्या काही शाश्वत क्षणांचे दर्शन घडविले. प्रसंगी जीतेंद्र, रोशनी दमानिया, अरीश दमानिया, शर्वरी लूथ, मिक्की मेहता, कुणाल विजयकर, बीना अजीज, कैलाश आणि आरती सुरेंद्रनाथ, कल्पना शाह, अनहिता देसाई, याझदी देसाई, अर्मायती तिरंदाज़, विराफ मेहता, रैल पदंसी, अनन्या गोएंका, रश्मी खट्टम आणि सतीश किशनचंदानी  यांच्यासह पारसी समाजातील अन्य ज्येष्ठ सदस्यांनीही 'पारसी - अ टाईमलेस लिगसी' च्या पूर्वावलोकनास उपस्थिती दर्शविली.
वारसा:
पारसी होण्यासाठी पर्सिया (इराण) मधील झोरोस्ट्रिअनच्या पहिल्या स्थलांतरातील वंशज म्हणून ओळखले जाणे गरजेचे असते, ज्यांना हजारो वर्षांपूर्वी निवास, संरक्षण आणि सुरक्षित आश्रय मिळालेला होता. पारसी असणे म्हणजे भारतातील वेगाने कमी होत जाणाऱ्या संस्कृतीच्या वांशिक समुदायाशी संबंधित आहे. आणि पारसी होणे म्हणजे जगातील सर्वात प्राचीन एकेश्वरवादी धर्माची ज्योत टिकवून ठेवण्याची अत्यंत मौल्यवान जबाबदारी स्वीकारणे.
संकुचित समुदाय:
स्थलांतराचे आवाहन, आंतरविवाहाचे परिणाम आणि पाश्चात्य मार्गांच्या आमिषाने भारतात आता फारसे पारसी शिल्लक राहिलेली नाहीत. २०१६ च्या आकडेवारीनुसार त्यांची संख्या ६१,००० पर्यंत खाली आली आहे आणि दिवसेंदिवस त्यात आणखीन घट होत आहे. ४०,००० आणखीन पारसी जगातील विविध कोपऱ्यात विखुरलेले आहेत आणि त्यांच्या विशिष्ट ओळखीसाठी त्यांची एक धडपड सुरू आहे. याबद्दल सांगताना परवेझ दमानिया म्हणतात की, “मला पारसी समुदायाचे नेहमीच आकर्षण वाटले आहे आणि मी याच समुदायाचा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे. आम्ही पारसी समुदायाच्या आयुष्याविषयी आणि त्यांच्या अस्तित्वाबद्दल लोकांना ज्ञान देण्यासाठी या प्रदर्शनाचा विचार केला. पारसी लोकांची संख्या कमी आहे, परंतु त्यांनी भारतासाठी मोठे योगदान दिलेले आहे. काही कलाकारांनी पारशी लोकांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी वेळ दिला आहे आणि बर्‍याचदा खाजगी आणि वैयक्तिक परंपरा असलेल्या गोष्टी कागदोपत्री ठेवण्याची परवानगी फार कमी लोकांना मिळाली आहे. पारसी संस्कृती, संस्कार आणि परंपरा अधिकाधिक लोकांमध्ये सामायिक करण्यासाठी आम्हाला ही संधी घ्यायची होती." पुढे रतन लूथसांगतात की, “हे प्रदर्शन वेगाने कमी होत चाललेल्या वांशिक समुदायाच्या संस्कृती, संस्कार आणि परंपरा यांचे दस्तावेजीकरण आणि जतन करण्याचा एक प्रयत्न आहे. पारशी वारसा लक्षात ठेवणे आणि सध्याची पिढी आणि पुढील पिढ्यांसाठी हे कायम लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. काळाच्या ओघात ते कायमचे नष्ट होणार नाही याची आम्ही खात्री करुन घेतो आहोत.”

छायाचित्रांचे वैशिष्ट्य :
या विशिष्ट प्रदर्शनात नेट जिओ ट्रॅव्हल अ‍ॅवॉर्ड सह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते फोटो जर्नलिस्ट शांतनु दास यांचे अंदाजे पन्नास कलाविष्कार दर्शविले जातील. शांतनु दास यांना संस्काराच्या सीमारेषा पार करण्याची परवानगी होती, त्यांनी पारसी लोकांच्या रूढी, परंपरांना मोहिनी घालून त्यांची संस्कृती, संस्कार तसेच कामाच्या ठिकाणी, समारंभात लोकांच्या ज्वलंत प्रतिमांना अनुभवत त्यांच्याबरोबर अनेक उत्सव साजरे केले आहेत .
शांतनु दास यांनी पाच ते सहा वर्षांच्या कालावधीतील या प्रदर्शनाचे कागदोपत्रीकरण केले आहे आणि इतर शहरांपैकी फक्त मुंबईतच नव्हे तर सुरत, उदवाडा आणि कोलकता येथेही शूट केले आहे. ते म्हणतात की, “पारसी लोक फार आनांदायक आणि उत्साहवर्धक आहेत. पारसी समुदायाला समर्पित असे हे माझे दुसरे प्रदर्शन आहे. बरीच वर्षे मी त्यांच्याशी संवाद साधत शूट करत आलो आहे, आणि त्यातून मी जाणले की  ते एक अतिशय दयाळू आहेत व इतरांच्या मदतीस नेहमी तत्पर असतात त्याचप्रमाणे ते कधीच कोणासाठीही कोणत्याही प्रकारच्या वाईट भावना, द्वेष मनात ठेवत नाहीत."
या विशिष्ट समुदाय आणि त्यातील उदात्त लोकांबद्दल एकता आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘पारसी - अ टाइमलेस लिगसीच्या या उद्घाटन सोहळ्यास विविध क्षेत्रातील ख्यातनाम आणि मान्यवर व्यक्तीमत्व उपस्थित असतील. या प्रदर्शनाची एक मनोरंजक बाब म्हणजे सेलिब्रिटीज बरोबर काही पारसी स्त्रिया आणि पुरुष ही ह्या उद्घाटन सोहळ्यात सामील असतील. ते आपल्या पारंपरिक पोशाखात म्हणजे दुग्ली व फेटामध्ये पुरुष तर महिला - भरतकामाच्या गॅरा परिधान करून उपस्थि

No comments:

Post a comment