तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 November 2019

रान बोक्याच्या हल्ल्यात दीडशे गावरान कोंबड्यांचा मृत्यू सावरगाव कान्होबा येथील घटना

मंगरूळपीर- सावरगाव कान्होबा येथील शेतकरी देवमन बाबाराव राठोड यांनी आपल्या शेतामध्ये कावेरी या जातीच्या जवळपास 150  कोंबड्यांना पालनाचा व्यवसाय सुरू केलेला आहे. राठोड यांच्या शेतामध्ये आज रात्री आठ ते नऊच्या दरम्यान जंगली बोक्याने हल्ला करून जवळपास 140 कोंबड्यांना ठार मारले आहे.
अल्पभूधारक असलेल्या देवमन राठोड यांचे शेत निसर्गाच्या कृपेवर वर अवलंबून आहे. निसर्गाचे असंतुलन निर्माण झाल्यामुळे पाऊस कधी कमी पडतो त्यामुळे पीक येत नाही तर पावसाळा चांगला असला तर आलेले पीक घरी येण्याच्या वेळी अति पावसामुळे हाता तोंडाला आलेले पीक ओरबडल्या जाते. निसर्गाच्या या अवहेलनेतून वाचण्यासाठी देवमन बाबाराव राठोड यांनी आपल्या शेतामध्ये छोटेखानी पोल्ट्री फार्म उभारून कावेरी या जातीचे जवळपास 150 कोंबड्या पाळल्या आहेत. पाच महिन्यापूर्वी सुरू केलेल्या हे पोल्ट्री व्यवसाय आता बहरात आलेला असताना राठोड हे शेतातून घरी जेवण्यासाठी आले असता जंगलातील बोक्यांनी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान या फार्ममध्ये शिरून जवळपास 140 कोंबड्या ची क्रूर कत्तल केलेली आहे. रान बोक्याच्या हल्ल्यात 140 कोंबड्या ठार झाल्या असून जवळपास दहा कोंबड्या गंभीर जखमी आहेत. प्रत्येक कोंबड्या ची किंमत ही पाचशे ते सातशे रुपयांच्या दरम्यान असल्यामुळे राठोड यांचे जवळपास 75 हजार ते एक लाख रुपयांचेआजमितीस नुकसान झालेले आहे.
जंगली जनावराच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याच्या झालेल्या हानीचे नुकसान भरपाई वनविभागाकडून व्हावी अशी मागणी बाधीत शेतकरी आणि गावकऱ्यांकडून होत आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

No comments:

Post a Comment