तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 22 November 2019

सौ. कल्पना खिस्ते यांचे निधन; मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला पूर्ण परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
        येथील सर्वपरिचित प्रतिष्ठित नागरिक तथा वैद्यनाथ देवल कमिटीचे माजी व्यवस्थापक विनायकराव खिस्ते यांच्या पत्नी सौ. कल्पना खिस्ते यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर परळी येथे आज दिनांक 21 रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांनी केलेल्या मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्पही पूर्ण करण्यात आला.
       जुन्या गावभागातील अबेवेस विभागातील गोपनपाळे गल्लीतील रहिवासी सौ.कल्पना विनायकराव खिस्ते यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्या ६५ वर्षे वयाच्या होत्या.त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दिवंगत सौ.कल्पना खिस्ते या अतिशय धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. गृहकर्तव्यदक्ष व कुटुंबवत्सल गृहिणी म्हणून जुन्या गावभागात , आप्तेष्टांमध्ये त्या सर्वपरिचित होत्या. परळी येथील मोक्षधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने खिस्ते कुटुंबियावर कोसळलेल्या या दु:खात तेजन्युज हेडलाईन्स परिवार सहभागी आहे.

मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला पूर्ण...!
     दरम्यान सौ.कल्पना खिस्ते यांनी नेत्रदानाचा संकल्प केला होता.आज त्यांचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प पूर्ण करण्यात आला.जालना येथील गणपती नेत्रालयाच्या वैद्यकीय पथकाने ही प्रक्रिया पूर्ण केली.

No comments:

Post a comment