तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 November 2019

पंचनाम्यांना अधिका-यांना जाण्या साठी आेढ्यावर केला लाकडी पुल
प्रतिनिधी
पाथरी:-आतिवृष्टिने बाधित शेती पिकाचे पंचनामे करण्यासाठी  तलाठी यांना शेतात येता यावं यासाठी रामपुरी खु. ता पाथरी येथील शेतकरी ज्ञानोबा सोपानराव गायकवाड यांनी बनवला लाकडी पूल.

अवकाळी पावसाने पाथरी तालुक्यात कहर केला. एकट्या पाथरी मंडळात बाराशे मीमी वर पाऊस झाला हा पाऊस जवळ पास वार्षिक सरासरीच्या दुप्पटीच्या जवळपास आहे.नुकसान भरपाई साठी पंचनाम्याची अट असल्याने पंचनामा व्हावा साहेबांना आपल्या शेतातील पीक परिस्थिती दाखवण्या साठी वाट्टेल ते प्रयत्न शेतकरी करत आहेत. पाथरी शहरातून येणा-या सर्व ओढ्याच पाणी हे एकाच ओढ्यातून येत असल्या मुळे नाल्यावर असलेल्या नळी टाकून केलेला पूल वाहून गेला त्यामुळे या आेढ्यावर आता लाकडी पुल तयार करण्यात आला आहे.
हा पूल बनवण्या साठी गोपाळ नाईक,नामदेव नाईक,मधुकर आगलावे,तुकाराम गायकवाड,विजय माळी या शेतक-यांनी मदत केली.

No comments:

Post a comment