तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 November 2019

प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र कपिलधार येथून परतणार्‍या भाविकांची रिघ ; श्री संत गुरूलिंग स्वामी मठात खिचडी प्रसादाची सोय; त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वैद्यनाथ मंदिरात दीपोत्सव

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी बुधवारी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. श्रीक्षेत्र कपिलधार येथील श्री संत मन्मथ स्वामी यांचे दर्शन घेवून परत येणार्‍या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश मधील भाविकांनी वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली,. सकाळपासून वैद्यनाथ मंदिरात भाविकांची रिघ लागलेली होती. मंदिर परिसरात प्रसाद साहित्याच्या दुकानावरही भाविकांची गर्दी दिसून आली त्यामुळे मंदिर परिसर फुललेले दिसून आले.
श्रीक्षेत्र कपिलधार येथून परतणार्‍या भाविकांसाठी श्री संत गुरूलिंग स्वामी मठ संस्थान (बेलवाडी) येथे श्री संत मन्मथ स्वामी सेवा संघाच्या वतीने खिचडी प्रसादाची सोय करण्यात आली. श्री संत मन्मथस्वामींच्या प्रतिमेची यावेळी पूजा करून भाविकांना खिचडी वाटप करणे सुरू केले. या उपक्रमामुळे अनेक भाविकांची बुधवारी सोय झाली. परळीचे माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे, परळी तहसीलचे नायब तहसीलदार सदानंद बरदाळे, परळी ग्रामीणचे पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, श्री संत गुरूलिंग स्वामी मठ संस्थानचे अध्यक्ष दत्ताप्पा इटके, सचिव अ‍ॅड.गिरीष चौधरी, विश्वस्थ शिवकुमार व्यवहारे, अर्जुन परमार, नारायणदेव गोपनपाळे , राजेंद्र ओझा, महादेव इटके, विकास हालगे, पत्रकार संघाचे आद्यक्ष धीरज जंगले, मोहन व्हावळे ,यांनी भेट देवून या उपक्रमाचे स्वागत केले. तसेच या मान्यवरांचे श्री संत मन्मथ स्वामी सेवा संघाच्या वतीने श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले.
दर वर्षी श्री संत मन्मथ स्वामी सेवा संघाच्या वतीने गेल्या तेरा वर्षापासून श्रीक्षेत्र कपिलधार येथून परतणार्‍या भाविकांसाठी खिचडी प्रसादाची सोय करण्यात येते. यावर्षीही ही सोय करण्यात आली. श्री संत मन्मथ स्वामी सेवा संघाचे श्री शिवराज बोटुळे, गुरूलिंग स्वामी, शिवलिंग स्वामी, मधुकर स्वामी, महालिंग स्वामी, लक्ष्मण बुद्रे, बालू सेलूकर ,राजा खोत,यांच्यासह इतर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतात. शहरात विरशैव महिला मंडळाच्या सदस्यांनी खिचडी वाटपासाठी सहकार्य केले.
वैद्यनाथ मंदिराच्या पायर्‍यालगत प्रसाद साहित्याचे दुकाने दोन दिवसापासून थाटली होती. या दुकानावर मंगळवारी व बुधवारी भाविकांची गर्दी होती.
मंगळवारी सायंकाळी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वैद्यनाथ मंदिरात दिव्यांची आरास केली होती. दिव्यांच्या झगमटामुळे मंदिर परिसर प्रकाशमय झाला होता. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भाविकांनी वैद्यनाथ मंदिर परिसरात दिवे लावले तसेच श्री कालरात्रीदेवी मंदिरातही अभिषेक करण्यात आला.

No comments:

Post a comment