तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 November 2019

शेतकरी,गायरानधारक,इनामी जमीन वहितीदारांच्या जमीनीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई व पिक विमा द्या ; मजूर व ऊसतोड कामगार यांना तात्काळ मदत करा . अनु.जाती आश्रमशाळा, अनुदान संघर्ष समितीचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

 (प्रतिनिधी)  :- 
राज्य सरकारने राज्यातील सरसगट शेतकरी,गायरानधारक, इनामी जमीन वहितीदार यांच्या जमीनीचे पंचनामे करुन संबंधित शेतकरी यांना विनाअट हेक्टरी ३०,०००/- रूपये नुकसान भरपाई व पिक विमा रक्कम अदा करावी,त्याचप्रमाणे समाजातील उपजिविकेचे कुठले ही साधन नसलेले शेतमजूर, घरमजूर,बांधकाम मजूर, ऊसतोड कामगार या घटकांना ही विनाअट प्रत्येकी १०,०००/- रूपये तात्काळ द्यावेत अशी मागणी अनु.जाती आश्रमशाळा, अनुदान संघर्ष समितीचे अध्यक्ष लहू बनसोडे यांनी उपजिल्हाधिकारी,अंबाजोगाई यांना शुक्रवार,दि.8 नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
अनु.जाती आश्रमशाळा,अनुदान संघर्ष समिती ही संघटना सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात काम करते. कामगार नेते रमेश जाधव, अध्यक्ष लहू बनसोडे, सरचिटणीस राजेंद्र सदावर्ते, प्रमुख संघटक संदीप वाकोडे हे प्रमुख कार्यकर्ते संपुर्ण महाराष्ट्रात प्रभावीपणे कार्य करीत आहेत.संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी,अंबाजोगाई यांना शुक्रवार,दि.8 नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे वरील मागणी केली आहे. सदरील मागण्या मंजूर न झाल्यास अनु.जाती आश्रम शाळा,अनुदान संघर्ष समिती ही संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर अनु.जाती आश्रमशाळा,अनुदान संघर्ष समितीचे अध्यक्ष लहू बनसोडे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, नगरसेवक बबनराव लोमटे, महादेव पोटभरे,बालासाहेब जोगदंड,संतोष मुळे,विशाल पवार,बाळासाहेब सरवदे,सतिश सातपुते,शिवाजी राऊत,महादेव राऊत,शरद केदार,धुराजी सरवदे,रामभाऊ सरवदे,सोमनाथ धोञे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

No comments:

Post a Comment