तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 November 2019

बैलजोडी दगावल्याने शेतकऱ्यावर संकट...... वरफळ गावातील घटना

परतूर/अथर शेख,आशिष धुमाळ

मागील महिन्यात आलेल्या आस्मानी संकट संपत नाही तोच सत्तास्थापने मुळे होत असलेला उशीर पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि यामुळे ओला दुष्काळ जाहीर होण्यास विलंब झाला आणि आता मात्र शेतकरी वर्गात कमालीची असवस्था राज्यात पाहायला मिळत आहे त्यात तालुक्यातील वरफळ येथील शेतकरी शेख खाजा शेख इस्माईल यांची बैल जोडी दगावल्याने शेख खाजा या शेतकऱ्याला अक्षरशः काय करावे म्हणून सूचन झाले असल्याने गावात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सविस्तर माहिती अशी की दिनांक १६ नोव्हेंबर रोजी शेतातील  दिवसभराच कामकाज अटपून बैलाला चारापाणी करून बैलगाडी घेऊन घरी आले आणि काही मिनिटांतच एक बैल जोरजोरात ओरडत होता हे पाहून गावातील इतर नागरिकांनी आखाड्याकडे धाव घेतली पाहता पाहता बैल खाली कोसळला आणि गतप्राण झाला त्यानंतर तत्काळ डॉ.धोत्रे हे घटना स्थळी दाखल झाले आणि त्या बैलास विषबाधा झाली असावी असा अंदाज व्यक्त केला

परंतु डॉ.धोत्रे हे घटना स्थळावरून परतूर कडे निघाले आणि 30 मिनिटांनी दुसऱ्या बैलाला सुद्धा तसाच त्रास सुरू झाल्याचे शेख खाजा व इतर नागरिकांच्या लक्षात आले आणि डॉक्टर यांना परत पाचारण करण्यात आले डॉक्टर घटनास्थळी दाखल होण्याअगोदर गावातील नागरिकांनी खासगी औषधी देऊन त्रास कसा कमी होईल यासाठी प्रयत्न केले मात्र काही फरक पडला नाही त्यानंतर डॉ धोत्रे हे आले आणि काही औषधउपचार करण्यास सुरुवात केली मात्र त्रास काही करेना कमी झाला नाही काही मिनिटात डॉक्टर सावंत हे आले आणि त्यांनी सांगितले की या बैलास विषबाधा झाली असावी म्हणून स्लाईन लावावी लागण औषध व स्लाईन लावायची तयारी करीत असताना बैल खाली कोसळला आणि दगावला ही घटना अकख्या गावाने आपल्या डोळ्याने पाहिली मात्र काही करता आले नाही याची खंत व्यक्त केली
याबाबत वैधकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १७ नोव्हेंबर रोजी सकाळी  संबंधित दोन्ही बैलाचे शवविच्छेदन शेतात नेऊन करण्यात आले तसेच तलाठी श्री अरुण कुलकर्णी यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला यावेळी गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती
यासर्व घटनेमुळे या शेतकऱ्यावर समोरआर्थिक संकट उभे राहिले आहे म्हणून शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली

No comments:

Post a comment