तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 November 2019

पालम तालुका : कामकाज रामभरोसे; अधिकाऱ्यांनाच माहिती नाही, कार्यालय सुरु आहे की बंदबारा वर्षांपासून प्रकल्प कार्यालयाचा कारभार प्रभारींवर


अरुणा शर्मा


पालम :- शहरातील जायकवाडी वसाहतीमध्ये तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकात्मिक बालविकास कार्यालयात मागील 12 वर्षापासून कायमस्वरुपी प्रकल्प अधिकारी मिळत नाही. त्यामुळे या कार्यालयाचा कारभार प्रभारी अधिकारयांवरच चालविला जात आहे. विशेष म्हणजे कार्यालयाचा नामफलकही गायब झाला असल्याने या कार्यालयाचा कारभार रामभरोसे सुरु असल्याचे दिसत आहे.
   पालम तालुक्यातील 82 गावांत 150 अंगणवाडया चालविल्या जातात. या अंगणवाडयांमध्ये 350 कार्यकर्ती व मदतनिस कार्यरत आहेत. कार्यालयामध्ये एकूण चार पर्यंवेक्षक, 2 लिपिक व एका सेवकांचा समावेश आहे. परंतू मागील 12 वर्षापासून प्रकल्प अधिकारी नसल्याने कार्यालयाचा कारभार प्रभारी अधिकारी यांच्या अधिपत्याखाली सुरु आहे. कायमस्वरुपी अधिकारी नसल्यामुळे तालुक्यातील बालकांना देण्यात येणारा सकस आहार व कर्मचारयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायमस्वरुपी अधिकारी नसल्यामुळे या ठिकाणी कार्यरत असलेल्या पर्यवेक्षिकांवर या कार्यालयांचा कारभार सुरु आहे. शहरातील जायकवाडी वसाहतीत भाडयाच्या जागेत हे कार्यालय सुरु आहे. 
    या ठिकाणी कार्यांलय दर्शविणारे फलक नसल्याने कार्यालय आहे की नाही हे कळायल मार्ग नाही. कार्यालयात प्रभारी अधिकारी असल्यामुळे कर्मचारयांवर वचक राहिला नाही. अधिकारयांच्या वेळेनुसार या कार्यालयाचा कारभार सुरु आहे. याहून बिकट अवस्था तालुक्यातील अंगणवाडी, मदतनिसांची होत आहे.
    मुलांना दिला जाणारा सकस आहार योग्यरित्या पुरवठा केला जात नसल्याच्या संदर्भात अनेक तक्रारी येऊनही फारसा उपयोग झाला नाही. या संदर्भात 6 नोंव्हेंबर रोजी कार्यालय दुपारी 1 वाजेपासून बंद अवस्थेत आढळून आले.
  या संदर्भात प्रभारी अधिकारयांना विचारणा केली असता, आम्ही कामानिमित्त बाहेरगावी आलो आहोत. कार्यालय बंद अथवा सुरु आहे. यासंदर्भात मला कसलीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

*वरिष्ठ अधिकारयांकडून पाठराखण*

* जायकवाडी वसाहतीमध्ये भाडयाच्या जागेवर सुरु असलेले प्रकल्प कार्यालय हे बहुतांश वेळी बंद अवस्थेत असते. नामफलक व अधिकारी भेटी देण्यासंदर्भात कार्यालयात असलेले रजिस्टरही उपलब्ध नाही.

* बुधवारी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान हे कार्यालय बंद अवस्थेत होते. या संदर्भात प्रभारी अधिकारी यरमे यांना विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.

* त्यामुळे वरिष्ठ अधिकारी प्रकल्प अधिकारयांना पाठीशी घालत आहेत की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारयांनी लक्ष द्यावे. अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment