तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 November 2019

आदरणीय व प्रिय उद्धवजींना मनस्वी शुभकामना - पंकजा मुंडेंनी व्यक्त केल्या भावनापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
      ठाकरे व मुंडे परिवारातील राजकारणा पलीकडे असलेले नाते लक्षात घेता उद्धव ठाकरे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असताना पंकजा मुंडे यांच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ट्विटरवरून शुभेच्छा देताना पंकजा मुंडे यांनी "आदरणीय व प्रिय उद्धवजींना मनस्वी शुभकामना" अशा शब्दात आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.   
    राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. यानंतर विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान माजी मंत्री व भाजपाच्या सुकाणु समितीतील (कोअर कमेटी) एक महत्त्वपूर्ण सदस्य असलेल्या पंकजा मुंडे यांच्या प्रतीक्रीया कडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले होते. ठाकरे आणि मुंडे परिवारातील राजकारणा पलीकडे नाते सर्वांनाच ज्ञात आहे. उद्धव ठाकरे हे पंकजा मुंडे यांना बहीण मानतात. त्यामुळे हा पारिवारिक स्नेह जपत पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की "आदरणीय व प्रिय उद्धवजी यांना मनःस्वी शुभकामना!! एका ठाकरेनी पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि एक मुख्यमंत्री झाले..हार्दिक अभिनंदन!! महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरा हीच आहे 'राज्याचे हित प्रथम '!! राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांना राज्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!!' आदरणीय बाळासाहेबांच्या स्वप्नांना व मराठी माणसाला असलेल्या अपेक्षा आपण पूर्णत्वाकडे घेऊन जाल हीच ईश्वर चरणी प्रार्थना !!"

No comments:

Post a comment