तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 November 2019

वाशिम जिल्हा पोलीस दला तर्फे ६७ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल मुळ मालकांना परत


फुलचंद भगत
वाशिम-मा. वसंत परदेशी  पोलीस अधिक्षक वाशिम यांनी वाशिम जिल्हयाचा पदभार स्विकारल्या पासुन अनेक नाविन्यपुर्ण उपक्रम हाती घेतले व ते यशस्वी सुद्धा केले. त्याचाच एक भाग म्हणुन मा. पोलीस अधिक्षक सो यांनी वाशिम जिल्हया चा आढावा घेतला असता वर्षानु वर्षे पोलीस ठाणे येथे मुद्देमाल हा प्रलंबित असल्याचे त्यांना दिसुन आले. म्हणुन त्यांनी वाशिम जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे येथे प्रलंबित असलेला मुद्देमाल त्यांचे मुळ मालक यांचे ताब्यात परत करण्या साठी एक मोहिम हाती घेतली. व गेल्या ०२ महिण्यापासुन या मोहिमेतंर्गत संपुर्ण वाशिम जिल्हयातील यंत्रणा कामाला लावली व सदर यंत्रणेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी अपर पोलीस अधिक्षक श्री. विजयकुमार चव्हाण यांना दिली. अपर पोलीस अधिक्षक विजयकुमार चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. शिवा ठाकरे यांचे नेतृत्वात स.पो.निरी. अजयकुमार वाढवे, पो.उप.निरी, भगवान पायघन, पो.ना, मुकेश भगत व पो.शि. किशोर खंडारे यांचे एक पथक तयार करून संपुर्ण जिल्हयाची माहिती घेवुन पोस्टेस्तरावर प्रलंबित असलेल्या मुद्देमाल त्याचे मुळ मालकास परत करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली. सदर मोहिमेत सर्व पोलीस ठाण्याचे हेड मोहरर यांनी मा. न्यायालयातुन ऑर्डर घेवुन सोन्या चांदीचे दागीने, मोटार सायकल, ट्रक व ट्रक्टर असा एकुण ६७ लाख९२ हजार १४४ रूपये किंमतीचा मुद्देमाल आज रोजी मा. पोलीस अधिक्षक वसंत परदेशी, अपर पोलीस अधिक्षक विजयकुमार चव्हाण, उप विभागीय पोलीस अधिकारी केडगे यांचे हस्ते जुने पोलीस मुख्यालय वाशिम येथे मुळ मालकाना परत केला आहे. सदर उपक्रमामुळे जनतेमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

फुलचंद नारायण भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

No comments:

Post a comment