तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 November 2019

आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवायला सांगणारा संदेश देणारी ‘झी टीव्ही’ची नवी मालिका ‘दिल ये जिद्दी है'


मुंबई (प्रतिनिधी) :-  ‘झी टीव्ही’वरील ‘दिल ये जिद्दी है’ या मालिकेचे उत्कंठावर्धक प्रोमोज प्रसारित झाल्यापासून सर्व प्रेक्षकांच्या नजरा या मालिकेच्या प्रसारणाकडे लागल्या आहेत. ही काजल नावाच्या एका स्वच्छंदी आणि आनंदी तरुण मुलीची कथा आहे. एका जैविक बिघाडामुळे उत्तरोत्तर आपली दृष्टी कमी कमी होत ती नष्ट होत जाणार असल्याचे समजल्यावरही नियतीच्या या खेळापुढे हार न मानता ज्या बंद डोळ्यांनी तिने आपली स्वप्ने पाहिली असतात, ती पूर्ण करण्याचा निर्धार अधिकच भक्कम करणार्‍्या काजलची ही कथा आहे. आपली स्वप्ने पूर्ण झालेली आपल्याला ‘पाहायला’ मिळणार नाहीत, याची तिला जाणीव असते. तेव्हा ती स्वत:लाच विचारते, “मी जर ही स्वप्नं बंद डोळ्यांनी पाहिली असतील, तर ती पूर्ण झालेली पाहण्यासाठी मला दृष्टीची खरंच गरज आहे का?”

 ‘मनोर रमा पिक्चर्स’ची निर्मिती असलेल्या या मालिकेतील काजलच्या मध्यवर्ती भूमिकेद्वारे ब्लॉगर असलेली आणि आता अभिनयाच्या क्षेत्रात उतरलेली मेघा राय ही टीव्ही मालिकांमध्ये पदार्पण करणार आहे. मालिकेचे कथानक झाँसीमध्ये घडते. तेथील 19 वर्षांची काजल ही खट्याळ मुलगी म्हणून सर्वपरिचित असते. आपल्या स्वप्नांनी आपण एक दिवस सारे जग जिंकू, अशी तिची दुर्दम्य इच्छाशक्ती असते. एकीकडे ती एक मिश्कील मुलगी असते आणि आता कोणाची खोडी काढायची, याचे विचार तिच्या मनात फिरत असतात. आपला शेजारी आणि सख्खा मित्र रोचक (शोएब अली) याच्याशी ती नेहमी कोणत्याही गोष्टीवर पैज लावत असे आणि त्यात ती नेहमी जिंकत असे. दुसरीकडे तिच्या नवनव्या इच्छा वाढतच असतात आणि तिला सारे जग फिरून पाहायचे असते. थोडीफार स्वकमाई व्हावी आणि वेळ जावा यासाठी ती झाँशीतल्या किल्ल्यात काही परदेशी पर्यटकांना एक नाट्यपूर्ण कथा सांगत असते. त्यानंतर ती या पर्यटकांचे नाव आणि पत्ता घेत असे. ती तसे का करते, असे विचारल्यावर काजल सांगते की आपण जेव्हा तुमच्या देशात फिरायला येऊ, तेव्हा आपण तुमची भेट नक्कीच घेऊ. साहजिकच ती नेहमीच इतरांना सांगत असते, “ग्याराह मुल्कों में मेरी पहेचान है!” आता आजच्या कालखंडात परतल्यावर काय दिसते? काजलला या असाध्य विकाराने ग्रासले असून उत्तरोत्तर तिची दृष्टी कमी कमी होत नष्ट होणार आहे, याची जाणीव तिला होते. आजाराचे हे स्वरूप कळल्यावर कोणतीही धडधाकट व्यक्तीही अंधत्त्वाच्या कल्पनेने गळून जाईल आणि निराशेच्या गर्तेत फेकली जाईल. पण आपली काजल ही विलक्षण जिद्दी स्वभावाची असून ती कोणत्याही परिस्थितीत हार मानण्यास तयारच नसते. आपल्या आजाराचे स्वरूप कळल्यावर ती जीवनाकडे एका वेगळ्याच जोमाने पाहू लागते. शारीरिक अपंगत्त्वाच्या शृंखला ती तोडून टाकते, आपल्या नशिबाची सूत्रे आपल्या हाती घेते आणि आपली स्वप्ने साकारण्याच्या प्रवासाला निघते… कारण ‘दिल ये जिद्दी है’  आणि शो मस्ट गो ऑन!

 झी टीव्हीच्या बिझनेस हेड अपर्णा भोसले म्हणाल्या, “झी टीव्हीवरील पुढील प्राईमटाईम ऑफरिंग ही आमचे ब्रॅन्ड तत्त्व ‘आज लिखेंगे कल’ मध्ये अगदी सुंदर पद्धतीने एकरूप होते. आमची नायिका काजल तिच्यासमोर अनेक अडचणी आल्या तरी नेटाने आपला आयुष्यप्रवास सुरू ठेवते ही ह्या कथेची मूळ संकल्पना असून अशा प्रकारच्या कथाकथनामधून आम्हांला आमच्या प्रेक्षकांना प्रेरणा द्यायची आहे. आपली आंतरिक शक्ती वापरून निराश न होता वर्तमानकाळात सक्रियपणे कार्यरत राहून असाधारण भविष्य घडवण्याची प्रेरणा आम्हांला आमच्या प्रेक्षकांना द्यायची आहे. ह्या मालिकेतून प्रेक्षकांसाठी एक साधा आणि सोपा संदेश आहे – की स्वतःमध्ये आणि स्वतःच्या स्वप्नांमधील दृढ विश्वासच त्यांची पूर्तता करू शकतात. स्वप्ने डोळ्‌यांनी नाही तर मनाने पाहिली जातात आणि मार्गात कितीही अडथळे आले तरी त्यांचा पाठपुरावा करणे आपण थांबवले नाही पाहिजे. हा छान शो आमच्या प्रेक्षकांपर्यंत आणताना मनोर रमा प्रॉडक्शन्ससोबत संलग्न होताना आम्ही आनंदात आहोत. ह्या मालिकेत एक से एक कलाकारांचा समावेश असून मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आशा आम्ही करतो.”

 ह्या मालिकेत नायिका काजलच्या रूपात अभिनेत्री मेघा रे, रोहित सुचांती आणि शोएब अली प्रमुख भूमिकांमध्ये, आणि सचिन खुराणा, सौरभ शर्मा, हेतल यादव व शुभांशी रघुवंशी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

 काजलसारख्या भूमिकेबद्दल मेघा रे म्हणाली, “आपण सगळेच काजलसारखे असतो तर किती छान झाले असते. ती छोट्‌या शहरातील मुलगी असून तिच्या आयुष्यात तिच्यावर कुठल्याही प्रकारचे दडपण नाहीये. ती हुशार आणि खूप सारी स्वप्ने असलेली एक तरूण मुलगी आहे. आपले खरे भविष्य शोधून काढण्याआधी तिला अनेक निर्णय घ्यावे लागतात. काजल अतिशय धैर्यशाली आहे आणि म्हणून मला ती अतिशय आवडते. तिची एक विश-लिस्ट आहे

No comments:

Post a Comment