तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 November 2019

या आपले शहर घडवूया उपक्रमा अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल स्वच्छता मोहिमेतील शनिवारी दुसरा टप्पा शहरवासीयांनी सहभागी होण्याचे आवाहनबीड :-
 जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांण्डेय यांच्या संकल्पनेतून या आपले शहर घडवूया या उपक्रमांतर्गत जिल्हा क्रीडा संकुल स्वच्छता अभियानाचा शनिवारी दुसरा टप्पा असून या अभियानात  शहरातील नागरिक , खेळाडू , खेळ संघटना, प्रशिक्षक व स्वयंसेवी संस्थानी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
         क्रीडा संकुलामध्ये नियमित सरावाला येणाऱ्या विविध खेळाच्या शेकडो खेळाडूंसोबतच ज्येष्ठ नागरिकयांचा मोठ्या प्रमाणामध्ये संकुलामध्ये वावर आहे. या क्रीडा संकुलामध्ये स्वच्छता अभियान राबवून या आपले शहर घडवूया या उपक्रमा अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्याचा संकल्प जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी केलेला आहे.गत शनिवारी दि.२३ नोव्हेंबर २०१९ रोजी या स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. प्रत्यक्ष जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांण्डेय यांच्यासह उप- विभागीय अधिकारी नामदेव टिळेकर ,तहसीलदार सचिन खाडे, एन आय सीचे प्रमुख प्रविण चोपडे ,नगर परिषदेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरखूलकर,जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्यासह विविध सामाजिक व क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, नागरिक व खेळाडूं यामध्ये सहभागी होणार आहेत. दुसरा टप्पा शनिवारी दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते १० या वेळेमध्ये क्रीडा संकुलाची स्वच्छता मोहीम अंतर्गत इनडोअर हाॕल , पॕव्हेलीयन , वस्तीगृह आदी पाण्याने स्वच्छ धुवून भिंतीवर रंगरंगोटी करण्यात येणार आहे. बीड नगर परिषदे अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
        स्वच्छता अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची आखणी करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल येथे गुरुवारी सायंकाळी ६ वा. उप विभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडलीत ,तहसीलदार  सचिन खाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर , क्रीडा संघटक डाॕ.अविनाश बारगजे अजहर शेख ,रेवननाथ शेलार ,धनेश करांडे, मुकेश बिराजदार , किशोर काळे , रतन कोकाटे, सचिन जाधव आदींच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली.
या आपले शहर घडवूया उपक्रमा अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल स्वच्छता मोहिमेतील शनिवारी दुसरा टप्पा होत असून यामध्ये
शहरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले आहे.

No comments:

Post a comment