तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 November 2019

पावसाच्या नुकसानीमुळे खोडवा सावरगांव येथील शेतकर्‍याची आत्महत्यापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परतीच्या पावसामुळे शेतातील काढणीस आलेले पीक वाया गेल्याने खोडवा सावरगांव येथील तरुण शेतकरी सोमनाथ ज्ञानोबा दहिफळे वय २२ या शेतकर्‍याने विषारी औषध प्राशनकरुन आत्महत्या केल्याची घटना घडली.
परळी तालुक्यात मागील १५ दिवसापासून परतीच्या पावसाने सातत्याने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकर्‍यांचे काढणीस आलेले सोयाबीन, उडीद, ज्वारी आदी पिके नष्ट झाली आहेत. तर नगदीपीक म्हणून ओळखले जाणारे कापसाचे वाती झाल्या आहेत. खोडवा सावरगांव परिसरातही या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सोमनाथ दहिफळे यांच्या शेतातील सर्व पिके नष्ट झाली आहेत.यामुळे अगोदरच कर्जबाजारी व पुन्हा पिक नष्ट झाल्याने पुढील काळात काय करायचे या विवंचनेत सोमनाथ हा शेतकरी होता. यातच दि.३० ऑक्टोबर रोजी त्याने विषारी औषध प्राशन करुन आपली जिवन यात्रा संपवली. सोमनाथ यांच्या आत्महत्येमुळे घरातील कर्तापुरुष गेला असून यानंतरही खोडवा सावरगांव परिसरातील शेतकर्‍यांना शासनाकडून कुठलीच मदत मिळालेली नाही. या आत्महत्येप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

No comments:

Post a comment