तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 November 2019

संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान: जिल्ह्य़ात द्वितीय क्रमांक पटकावलेल्या टोकवाडीची विभागिय स्तरासाठी तपासणी ; विभागिय तपासणी पथकाकडून समाधान व्यक्त

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
        प्रत्येक सार्वजनिक कार्यात आपल्या सामाजिक जाणिवा दर्शवत काम करणाऱ्या आणि सामाजिक उपक्रमांची जोड देत गावाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेल्या टोकवाडी ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या कामातही आपला ठसा उमटविला आहे.संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात बीड जिल्ह्यातून टोकवाडी ग्रामपंचायतने  द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे.या पार्श्वभूमीवर विभागस्तरावरील पारितोषिकासाठी नुकतीच टोकवाडी येथे तपासणी करण्यात आली. विभागीय तपासणी पथकाकडून यावेळी  समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
       टोकवाडीच्या सरपंच सौ. गोदावरी राजाराम मुंडे यांच्या माध्यमातून गावातील विविध विकासात्मक बदल मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. वरद गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य डाॅ. राजाराम मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली टोकवाडी येथे सामाजिक,शैक्षणिक, भौतिक सुविधा, स्वच्छता, शालेय गुणवत्ता आदी सर्वदृष्टीने सातत्यपूर्ण अभिनव उपक्रम राबवत सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न असतो.या अनुषंगानेच स्वच्छतेबाबत जाणीव जागृती बरोबरच घंटागाडी व दैनंदिन स्वच्छता विषयक व्यवस्थापन करत टोकवाडी ग्रामपंचायत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावून अव्वल ठरलेली आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०१८-१९ अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावर अव्वल ठरलेल्या ग्रामपंचायतींची  विभागस्तरावर निवड करण्यासाठी विभागीय परिक्षण समितीच्या वतीने तपासणी दौरा काढण्यात आला होता. या अंतर्गत  टोकवाडी ग्रामपंचायतीची पहाणी व तपासणी करण्यात आली.
        यावेळी तपासणी पथकातील उप सहाय्यक आयुक्त सौ.सुपेकर मॅडम, पथकातील सहभागी सदस्य कुलकर्णी साहेब, येवले साहेब , घुमरे साहेब, बीड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी काकडे साहेब, वाणी मॅडम, जि.प.बांधकाम उप अभियंता नागरगोजे साहेब, बाभळे साहेब, जाधव साहेब, श्रीमती देशमुख, डी.एम.होळबे, अशोक नागरगोजे  पंचायत समिती कर्मचारी राहुल दुबे, कुणाल मुंडे, शेख एम.एच. वचारे, वडमारे आदींनी पहाणी केली. या वेळी तपासणी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वागत पंचायत समितीचे उपसभापती बालाजी (पिंटु) मुंडे, सरपंच सौ. गोदावरी राजाराम मुंडे, उपसरपंच मंदाकिनी संदिपान काळे,  सर्व ग्रा. प. सदस्य  यांनी केले. याप्रसंगी गावातील तरुणवर्ग, जेष्ठ नागरीक, सर्व शिक्षकवृंद, वर्धिनी ताई,ग्रामसंघ अध्यक्ष, स्वच्छताग्रही, बचत गट महिला मंडळ, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आदी उपस्थित होते.

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a comment