तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 November 2019

मंगरुळपीर येथे सर्वधर्मीय सद्भावना व एकता रॅली ऊत्साहात

फुलचंद भगत
वाशिम-रामजन्मभुमी व बाबरी मश्जीद या संवेदनशिल विषयावर माननिय सर्वोच्च न्यायालय यांचेकडुन पुढील काही दिवसात निकाल अपेक्षीत आहे.निकाल कोणत्याही बाजुने लागो परंतु मंगरुळपीर शहरातील सर्वधर्मीयांची एकता आणी अखंडता अबाधित ठेवन्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेवून आणी पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने शहरातुन सर्वधर्मीयांची मोठ्या ऊत्साहात सद्भावना रॅली काढुन एकात्मतेचे दर्शन घडवले.
 रामजन्मभुमी आणी बाबरी मश्जीदचा संवेदनशिल  निकाल देणारी यंञना म्हणजेच देशाची सर्वौच्च न्याय व्यवस्था आहे त्यांच्यावर सर्व भारतियांचा विश्वास आहे.तरी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा सर्व भारतिय नागरीकांनी पाळणे बंधनकारक आहे.या प्रकरणाचा काहीही लागो परंतु सर्वधर्मीयांनी आपला एकोपा कायम ठेवणे तितकेच महत्वाचे असल्याने मंगरुळपीर शहरातील सामाजीक कार्यकर्त्यांनी,सर्वधर्मीय बांधव,राजकीय व विविध क्षेञातील लोकांनी एकञ येवुन पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने शहरामधुन सद्भावना आणी शांतता रॅली काढली.सर्वधर्मीय बांधवांनी शांतता आणी सुव्यवस्था राखन्यासाठी पुढाकार घेणे म्हणजेच अजुनही शहरामध्ये एकमेकांच्या धर्माविषयी आदर आणी प्रेमभावना असुन यामध्ये कुठलेही गालबोट लागु नये यासाठी शहरवाशीयांनीच एकञ येवुन प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मतही यावेळी व्यक्त करन्यात आले.सर्वधर्मीयांने गुन्यागोविंद्याने आणी एकात्मता जोपासत माननिय सर्वौच्च न्यायालयाचा सन्मान करणे आणी भारतीय संविधानाचाही आदर आणि सन्मान करणे प्रत्येक भारतीयांचे आद्य कर्तव्य असल्याचे मान्यवरांनी मत व्यक्त केले.येणारा निकाल हा प्रत्येकांनी  खिलाडु वृत्तीने स्विकारुन त्याचा आदर करावा.धर्माधर्मात तेढ निर्माण होणार नाही याचीही प्रत्येकाने काळजी घ्यावी.कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करुन शहरात शांतता आणी सुव्यवस्था नांदावी याकरीता प्रत्येक धर्मीय बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहनही पोलिस प्रशासनाकडुन करन्यात आले.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

No comments:

Post a Comment