तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 November 2019

रामलल्ला जन्मभूमीवर सुप्रीम मोहर - ना. पंकजाताई मुंडे यांनी केले न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतमुंबई (प्रतिनिधी) :-  ९.. रामलल्ला जन्मभूमी वर सुप्रीम मोहोर अशा शब्दांत ना पंकजाताई मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. देशातील नागरिकांना शांतता, संयम आणि परस्परांशी सन्मान ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 

  यासंदर्भात फेसबुकवर पोस्ट करून पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, राम मंदीर साकार होणार ! देशातील प्रत्येकाच्या विश्वासाची एक-एक वीटच ते उभारणार , एक वचनी, एक बाणी श्री रामाच्या आदर्श राज्यासारखं राज्य जनतेला मिळावं, सर्व धर्मांना सोबत घेऊन या देशात लोकं नांदावेत अशी परिस्थिती निर्माण करणं हे आपलं, तुमचं - आमचं भारतीयांचं दायित्व आहे, शांतता आणि संयम आणि परस्पर सन्मान ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

No comments:

Post a Comment