तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 4 November 2019

अतिवृष्टीमुळे झालेल्या जिल्ह्यातील पीक नुकसानीची विभागीय आयुक्त केंद्रेकर आणि जिल्हाधिकारी पाण्डेय यांच्याकडून पहाणी
बीड, (जि.मा.का.) दि.02 :- विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी अतिवृष्टी मुळे झालेल्या बीड जिल्ह्यातील पीक नुकसानीची थेट शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी गेवराई, माजलगाव व बीड तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांशी चर्चा करुन माहिती घेतली. याप्रसंगी गेवराई तालुक्यातील भेटीप्रसंगी आमदार लक्ष्मण पवार आणि माजलगाव तालुक्यातील तालुक्यातील भेटीप्रसंगी आमदार प्रकाश सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी त्यांनी गेवराई तालुक्यातील चकलांबा, उमापूर परिसरातील गाव शिवारात भेट देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. रेवकी, देवकी, बागपिंपळगाव व संगमजळगाव यासह विविध गावांमधील पिक पाहणीनंतर शेतकऱ्यांशी चर्चा करताना विभागीय आयुक्त श्री.केंद्रेकर यांच्यासमवेत जिल्हाधिकारी श्री पाण्डेय, आमदार श्री. पवार, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यासह विविध अधिकारी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

माजलगाव तालुक्यातील टाकरवण, श्रृंगारवाडी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना आयुक्त श्री.केंद्रेकर, आमदार श्री.सोळंके, जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय, उपविभागीय अधिकारी शोभा ठाकुर, तहसिलदार डॉ.प्रतिभा गोरे उपस्थित होते.

यानंतर विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसान पहाणी दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथील प्रगती सभागृहात पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम उपस्थित होते.

विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी परतीच्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांची प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकर्‍यांनी खचून जावू नये. जिल्ह्यात नुकसानीमध्ये बाजरी, कापुस, मका, सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.  शेतकर्‍यांनी विमा कंपनीमार्फत भरपाईसह या आपत्तीमुळे थेट शासनाकडून देखील शेतकर्‍यांना मदत देण्यात येईल. यादृष्टीने आवश्यक माहिती राज्य शासनाकडे पाठविली आहे. थेट  गावांमध्ये जाऊन शासकिय यंत्रणेकडून पीक नुकसानी माहिती घेतली जाईल. यासाठी महसूल, ग्रामविकास व कृषी विभागासह संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसानीचे अर्ज देण्यासाठी तालुकास्तरावर व कार्यालयांमध्ये गर्दी करण्याची गरज नसून शासन सर्वोतोपरी शेतकर्‍यांसोबत आहे असा विश्वास दिला.

No comments:

Post a Comment