तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 November 2019

डेंग्यु नियंत्रणासाठी उपाययोजना राबवाव्यातआमदार संतोष दानवे यांचे सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना पत्र

गणेश एन.सोळुंके, भोकरदन प्रतिनिधी.
----------------------------------------

      भोकरदन तालुक्यात मोठ्या प्रमाणात डेंग्युचे रुग्ण आढळून येत असतांना आरोग्य विभाग करत असलेल्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. त्यामुळे डेंग्युला प्रतिबंध करण्यासाठी तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक व स्थानिक आरोग्य सेवकांनी गावाच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करावे, साथरोगांचा फैलाव रोखण्यासाठी घरोघरी जाऊन आवश्यक उपाययोजनांसह जनजागृतीची मोहीम हाती घ्यावी अशा सुचना आ.संतोष दानवे यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत.

      भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात 50हुन अधिक डेंग्युसदृश्य रूग्णांची नोंद झाली आहे. शिवाय खासगी रुग्णालयातही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. ही बाब गंभीर असून डेंग्युला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागासह ग्रामपंचायत प्रशासनाने, सामाजिक कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. रस्त्यावर साचलेले पाणी, अस्वच्छ नाल्या, साचलेली पाण्याची डबकी इ. मुळे डासांचा उपद्रव वाढत आहे. डासांचा उपद्रव होऊ नये यासाठी पाणी एकाजागेवर थांबु न देता नाल्या वाहत्या कराव्यात, डबक्यातील पाण्यावर रोगप्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करणे आवश्यक असल्याचे तसेच स्वच्छता मोहिमेसह इतर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे आ.संतोष दानवे यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.

       गावातील नागरिकांच्या आरोग्याची जाबाबदारी स्थानिक ग्रामपंचायत व आरोग्य विभागावर आहे. त्यामुळे तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक गावात प्राधान्याने स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच उपविभागीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे अशा सुचनाही आ.दानवे यांनी पत्राद्वारे केल्या आहेत.
        
╭═══════════════╮
   ▌प्रतिनिधी 'गणेश एन.सोळुंके' 
भोकरदन.
-----------------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 8390132085  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment