तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 26 November 2019

संविधान दिनानिमित्त महामानवाला अभिवादन
फुलचंद भगत
वाशिम - जगातल सर्वात मोठ लिखित संविधान हे महान भारत देशा कडे आहे म्हणुनच भारत हा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश म्हणुन जगभरात नावलौकिक आहे. त्याच अनुशंघाने या देशाला सर्वोत्तम लिखित घटना देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आज दि. 26-11-19 रोजी सकाळी 9 वाजता कारंजा स्थानिक डाँ.आंबेडकर चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
         कार्यक्रमाला सर्वप्रथम फोटोला हारार्पण करून वंदना घेण्यात आली व अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला सर्व समाजातील युवकांची लक्षणीय उपस्थिति होती यावेळी संविधानाच्या सर्मथनात घोषणाबाजी करून कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
     यावेळी कार्यक्रमाला तरूण मित्र मंडळ अध्यक्ष किशोर उके, बहूजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी युवा नेता सचिन खांडेकर, बंटी बोरकर, सतिष गुळदे, अँड.कुंदन मेश्राम, श्याम घोडेस्वार, महेंद्र गुळदे, अमोल अंभोरे, योगेश खंडारे, मिलिंद गवई, निखिल सोनोने, संदेश बनसोड, अक्षय भगत, पवन मेश्राम, लखन बागडे, नितिन गजभिये, उमेश वर,अमोल बनसोड, सतिष मनवर, गणेश माहूरकर, इश्वर गोंडाने उपस्थित होते.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

No comments:

Post a comment