तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 November 2019

गेवराई : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी - सौ. लताताई पंडित
सुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. २ _ ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांंचे रब्बी हंगामातील कापूस, बाजरी, भुईमूग, मूग, सोयाबीन आदि पिकांचे आतोनात नुकसान झालेले आहे. म्हणून शासनाने गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सौ. लताताई पंडित यांनी केली आहे.
           बळीराजाच्या तोंडाशी आलेले पिक गेल्याने त्याची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकार दरबारी चांगलीच धावपळ करावी लागत आहे. अवकाळी झालेल्या पावसाने खरिपाचे तोंडाशी आलेले पिक गेले आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची सूचना देण्यासाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत आहेत. अतिवृष्टीची सरसकट नुकसान भरपाई देणे आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सौ. लताताई पंडित यांनी सध्याच्या नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नूकसानीचे पंचनामे तातडीने करून शासनास अहवाल सादर करण्यासही सांगितले आहे. बीड जिल्हयासह मराठवाड्यातील शेतकरी गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत असतानाच चालू हंगामात गेल्या काही दिवसांपासून सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात आहे. 
        अशा परिस्थितीत त्यांना शासना मार्फत मदत करण्यासाठी आवश्यक पंचनामे करून तसा अहवाल तात्काळ सादर करावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सौ. लताताई पंडित, सुरेश नवले, यशवंत टकले, मंगलताई आगलावे, नवनाथ आडे, सिताराम पंडित, वैशाली साखरे, नवनाथ आडे यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment