तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 1 November 2019

पीक विम्याचे अर्ज भरण्यासाठी कृषी कार्यालयावर तोबा गर्दीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परतीच्या पावसाने उध्दवस्त केलेल्या शेतातील पिकांची नुकसान भरपाई शेतकर्‍यांना हवी असेल तर पिक विमा कंपन्यांना अर्ज सादर करणे बंधनकारक असल्याची माहिती कृषी विभागाचे अधिक्षक निकम यांनी  दिले. विम्या कंपन्यांनी नुकसान भरपाई बाबत केवळ ७२ तासाचा अवधी दिल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा रांगा कृषी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात दिसून येत असून अद्याप ६० टक्यापेक्षा जास्त शेतकरी अर्ज देण्यापासून वंचीत आहे. वरिष्ठ पातळीवर सदरचे अर्ज स्विकारण्यासाठी मुदत वाढ देण्याबाबत चर्चा सुरू असून शेतकर्‍यांना पिक विमा मिळवण्यासाठी अर्ज भरावाच लागणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनो आपला अर्ज भरण्यासाठी तालुका कृषी कार्यालय गाठा आणि आपला अर्ज त्याठिकाणी विमा भरलेल्या पावतीसह सादर करा.
जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने अतिवृष्टी झाल्यामुळे हिरावून घेतला आहे. यामध्ये बाजरी, सोयाबीन आणि कापूस यांचे मोठे नूकसान झाल्याने दुहेरी आर्थीक संकटात सापडला आहे. त्यामुळे विमा भरलेल्या शेतकर्‍यांनी नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आपला अर्ज आणी विमा भरलेला प्रस्ताव तालुका कृषी कार्यालयात जमा करणेच आवश्यक आहे असे अधिक्षक कृषी अधिकारी निकम अधिकारी यांनी सांगीतले आहे.
यावर्षी सरकारी कृषी विमा कंपनीच्यावतीने जिल्ह्यातील शेतकर्‍याचा विमा भरुन घेतलेला आहे. प्रत्येक वर्षी शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देतांना संबंधीत विमा कंपनी त्यांच्या सोयीने सर्वे करुन विमा शेतकर्‍यांना लागु करत होते. मात्र यावर्षी ज्या शेतकर्‍यंाचे नुकसान झाले आहे. अशा शेतकर्‍याने विमा भरल्याचा कागद आपल्या प्रस्तावासोबत जोडून तो तालुका कृषी कार्यालयातील उपस्थित असलेल्या विमा कंपनीकडे दिल्यानंतर संबंधीत विमा कंपनीचे कर्मचारी आणि कृषी विभागाचे कर्मचारी संयुक्तरित्या त्या शेतकर्‍याचे नुकसान पाहणी करणार आहे. आणि पाहणी अहवालानंतरच या शेतकर्‍याला विमा दयायचा का नाही आणि किती दयायचा हे ठरविण्यात येणार आहे. मात्र अगोदरच अवकाळी पावसाने गारठलेल्या शेतकर्‍यांना उपाशी तपासी पोटी सात बारा आठचा उतारा परत काढून हजारो शेतकर्‍यांच्या लाईनीत आपला अर्ज सादर करावा लागणार आहे. यासाठी कृषी, विमा कंपनी आणि महसुल विभागाच्या संयुक्त चर्चेतून या विमा कंपनीने तालुका कृषी कार्यालयात आपले कर्मचारी बसुन अर्ज घेण्यासोबतच महसुल मंडळ स्तरावर विमा कंपनीच्या कर्मचार्‍याला बसवुन हे अर्ज शेतकर्‍यांकडून घ्यावे असे मागणी शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात होत आहे.
जिल्ह्याधिकारी कार्यालयात कृषी आणि विमा कंपनीच्या अधिकार्‍यांची बैठक संपन्न.
शेतकर्‍याला दिलेली ७२ तासाची मुदत वाढवण्यासाठी आज जिल्हाधिकारी डॉ.अस्तिक कुमार पांण्डेय यांनी अधिक्षक कृषी अधिकारी आणि विमा कंपनीचे समन्वयक दराडे यांची संयुक्त बैठक बोलावली असून हे अर्ज घेण्यासाठी मुदत वाढवण्यासोबत शेतकर्‍यांना हे अर्ज देणे सुलभ कसे करता येईल यामुळे ही बैठक   घेण्यात आली.

No comments:

Post a Comment