तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 November 2019

बी एस एन एल च्या कृपेने पोलीस स्टेशन नॉट रीचेबल!:--  तालुक्यातील  तिन्ही पोलीस स्टेशन मधील लँडलाईन फोन मागील काही महिन्या पासून नॉटरिचेबल.

:-- सामान्य माणसाला पोलीस स्टेशनला संपर्क करणे झाले अवघड.

:-- पोलीस स्टेशनशी वेळेवर संपर्क न झाल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता.

डोणगांव ३०

मेहकर तालुक्यात मेहकर,जानेफल व डोणगांव हे तीन पोलीस स्टेशन येतात या तिन्ही पोलीस स्टेशन मध्ये एक समान गोष्ट आहे ती म्हणजे या ठिकाणी असले लँडलाईन टेलिफोन कधीच लागत नाहीत लागला तर आवाज एकुयेत नाही अशात पोलीस स्टेशनशी संपर्क करण्या साठी सामान्य जनतेला खूप त्रास होत आहेत याचा परिणाम गुन्हेगारीत वाढीवर सुद्धा होऊ शकतो.
     मेहकर तालुक्यातील मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत मेहकर टाऊन मध्ये दोन बिट,ब्रम्हपुरी,सुलताणपूर, दे माळी, वेणी,पारडा,खंडाळा देवी,सोनाटी ह्या बिट येतात तर डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत डोणगांव, बेलगाव, विश्वी ,घाटबोरी,अंजनी बु,मादणी व जानेफळ पोलीस स्टेशन अंतर्गत जानेफळ,वडाळी, शेदला, माळेगाव, कळमेश्वर,वरवंट,दे साकरशा या तिन्ही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील जनतेला पोलीस स्टेशनशी संपर्क साधायचे असेल तर पोलीस स्टेशन मध्ये असणाऱ्या लँडलाईन फोनवर संपर्क साधावा लागतो मात्र जास्तीत जास्त वेळी हे लँडलाईन फोन बंद असतात किव्हा तिकडचा आवाज इकडे येत नाही किव्हा इकडचा आवाज तिकडे जात नाही अशात पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करणे खूप अवघड होऊन गेले.
    पोलीस स्टेशन मधील लँडलाईन फोन हा सामान्य जनतेच्या आधार आहे कोणतीही अप्रिय घटना घडत असेल किव्हा घडण्याची आशंका असेल तेव्हा अपघात ,लूटपाट,सुरक्षेला धोका,तेव्हा कोणीही पोलीस स्टेशनला लँडलाईन वर संपर्क करू शकतो संपर्क करणार्यांचा मोबाईल नंबर दिसत नाही आणि फोन लावल्यावर फोनवर संपर्क होण्याची हमी त्यामुळे प्रत्येकाकडे पोलीस स्टेशनला लँडलाईन नंबर असतोच तर प्रत्येक पोलीस स्टेशनच्या सरहद्दीवर फलकवर सुद्धा लँडलाईन नंबर लिहिलेला असतो तर विविध वेबसईडवर सुद्धा पोलीस स्टेशनला लँडलाईन फोन नंबर दिलेला असतो मात्र हे फोन लागतच नसल्याने सामान्य जनतेला खूप त्रास सहन करावा लागतो.
मेहकर पोलीस स्टेशनच्या नंबरवर फोन लागत नाही लागला तर आवाज ऐकू येत नाही तर डोणगाव पोलीस स्टेशन मधील फोन कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे असे ऐकायला मिळते व जानेफळ पोलीस स्टेशनच्या फोनची सुद्धा अशीच अवस्था आहे.

(यावर बी एस एन एल च्या मेहकर कार्यालयातील बाजाड या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आमच्या कडे अद्याप परियानंत कोणतीच तक्रार आलेली नाही जानेफळ पोलीस स्टेशन मधील लँडलाईन फोन मध्ये काही त्रुटी येऊ शकतात त्या रस्त्याच्या कामांमुळे अशी माहिती त्यांनी दिली)

 जमील पठाण
8805381333

No comments:

Post a comment