तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 4 November 2019

शेतीचे "पावसामुळे" प्रचंड नुकसान गेवराई तालुक्यातील शेतकरी हताशसुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. ५ _ तालुक्यातील असलेल्या शेतीचे "पावसाने" मोठे नुकसान केले असून, हातातोंडाशी आलेला सोन्या सारखा 'घास' निसर्गाच्या तडाख्यात वाहून गेल्याचे दुर्दैवी चित्र पहायची वेळ बळीराजावर आली आहे. दरम्यान कापसासह अन्य पिके भिजल्याने आर्थिक फटका बसलेल्या शेतकर्‍यांना तातडीने मदत करण्याची मागणी केली जात आहे. 
        गेवराई तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकर्‍यांना नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. बाजरी, कापूस, मका, कडूळ सडले आहे. त्यामुळे दुभत्या जनावरांसाठी चारा विकत आणावा लागत आहे. त्यात पून्हा पेंड आणि उसाचा भाव वाढला आहे. पैसे आणायचे कोठून, असा प्रश्न पडला आहे.  तालुक्यातील एकुण शेतजमीन क्षेत्रापैकी ९० हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी झालेली होती. कापसाचे प्रमाण सर्वाधिक आहे. बाजरी व अन्य पिके काही ठिकाणी आली. काही ठिकाणी उशीरा पाऊस पडला. त्यामुळे काही पिके उशिरा आली. परंतू नेमक्या वेळी पावसाने आल्याने पिके काढता आली नाहीत. बाजरी, तूर, मूग, सोयाबीन, कापूस, मटकी पिकांना जोरदार फटका बसला आहे. परतीच्या प्रवासाने सगळे गणित बिघडले आहे. जून पासून पावसाने उघडझाप करून शेतकऱ्यांची झोप उडविली होती. पाऊस नाही, चारा नाही, ढग यायचे अन् जायचे, त्यामुळे पिके धोक्यात आलेली. अशा बिकट अवस्थेत सरकारने चारा छावण्या सुरू ठेवल्या होत्या. काही भागात पाऊस झाला होता, मात्र त्यावर काहीच भागत नव्हते. कारण पाणी पातळी खोल गेलेली होती. अशा विचित्र परिस्थितीत पावसाने आपले अक्राळ विक्राळ रूप धारण करून, शेत पिकांची नासाडी केली आहे. शेतात पाणीच पाणी झाले आहे. पिके काढता येत नाहीत. तरीही शेतकर्‍यांनी ओला कापूस घरी आणून टाकला आहे. उन पडले की, कापूस , बाजरी वाळायला घातली जात आहे. जवळ पैसा अडका नसल्याने, बाजरी कापूस बाजारात विकायला आणत असल्याचे चित्र आहे.
         दरम्यान येथील जिनिंग मालकांनी फणा काढायला सुरुवात केली असून, कापूस ओला असल्याने दोन हजार रुपये भाव काढला आहे. एकीकडे निसर्गाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकर्‍यांची आता व्यापारी देखील अडवणूक करत असल्यामुळे शेतकर्‍यांच्या संकटात अधिक वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान बीड जिल्ह्याच्या खासदार प्रितम मुंडे यांनी नुकसान झालेल्या शेतीतील पिकाची पाहणी केली.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment