तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 November 2019

अभिनव विद्यालय येथे हे विद्यार्थी दिवस उत्साहात साजरापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
    ज्ञानप्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील पहिला दिवस विद्यार्थी दिन म्हणून मोठ्या उत्साहात संस्थेचे अध्यक्ष राजेभाऊ जबदे यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून सहशिक्षक श्रीकांत कांदे उपस्थित होते. सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून,  विद्यार्थ्यांना शिक्षण विषयी मोलाचे मार्गदर्शन यावेळी प्रमुख अतिथी साहेबराव फड यांनी केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो प्रशाशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशी सिंहगर्जना देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षण घेऊन जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे संविधान तयार केले त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये अनेक पदव्या मिळवून ते विश्वरत्न ठरलेले आहेत हे सर्व फक्त शिक्षणामुळेच शक्य झालेले आहे त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षणामध्ये गोडी निर्माण करून शिक्षण घेऊन समाजसेवा व देश हित जोपावे असे मनोगत यावेळी साहेबराव फड यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक इम्रान खान तर उपस्थितांचे आभार संतोष मुंडे यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment