तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 25 November 2019

सेलूत ४ डिसेंबरपासून श्री केशवराज बाबासाहेब महाराज यात्रोत्सवश्रीमद् भागवत कथा, कीर्तन, भजन आदी कार्यक्रम

सेलू ( जि.परभणी ), दि.२५ / प्रतिनिधी :
शिर्डीचे संत श्रीसाईबाबांचे सद्गुरू श्री केशवराज बाबासाहेब महाराज ( व्यंकूशाह ) यांच्या २१८ व्या यात्रा महोत्सवास बुधवारपासून ( ४ डिसेंबर ) सुरूवात होत आहे. यानिमित्त श्रीमद् भागवत कथा, कीर्तन, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रा महोत्सवात बुधवारपासून  (४ डिसेंबर ) मंगळवारपर्यंत ( १२ डिसेंबर ) या कालावधीत दैनंदिन कार्यक्रमांसह अखंड हरिनाम सप्ताह, विष्णू सहस्त्रनाम, श्रीगुरुचरित्र पारायण व सकाळी अकरा ते चार यावेळेत श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. नंदकुमार महाराज गोंदीकर हे कथा निरूपण करणार आहेत, तर बुधवारपासून ( ४ डिसेंबर ) ते शनिवारपर्यंत ( ७ डिसेंबर ) कीर्तन केसरी संदीप महाराज मांडके ( जेजुरी ) यांचे कीर्तन होणार आहे. रविवारी ( ८ डिसेंबर ) श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ओवीबद्ध चरित्राचे पाठ, श्रीमद् भगवद्गीतेचे पाठ व रात्री नऊ वाजता वसंतबुवा मंडलिक यांचे श्रींच्या चरित्रावर कीर्तन होईल. सोमवारी ( ९ डिसेंबर ) रात्री नऊ वाजता भारती दीपक रणनवरे ( जालना ) यांचे कीर्तन , तर मंगळवारी ( १० डिसेंबर ) रात्री नऊ वाजता पुरूषोत्तम महाराज वालूरकर यांचे हरिकीर्तन होईल. बुधवारी ( ११ डिसेंबर ) यात्रेचा मुख्य दिवस आहे. यानिमित्त दुपारी बारा वाजता श्रींची महाआरती, महाप्रसाद व सायंकाळी पाच वाजता श्रींचा पालखी सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. गुरूवारी ( १२ डिसेंबर ) दुपारी चार वाजता सुनील महाराज आष्टीकर यांचे काल्याचे कीर्तन होईल.
महोत्सवात शहरातील विविध भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम होईल. मृदंगाचार्य विठ्ठल काळे, सदाशिव समेळ, बाबासाहेब खुपसेकर, मच्छींद्रनाथ घायाळ, सुधाकर शिंदे, केदार तांबट, संवादिनीवर नागनाथशास्त्री विडोळीकर, वसंतबुवा मंडलिक, सदाशिव जाधव, तर तबल्यावर तालदास गिरीश सातोनकर हे साथसंगत करणार आहेत. सर्व कार्यक्रम व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वसंतबुवा मंडलिक, दत्तात्रय मंडलिक, केशव मंडलिक, व्यापारी मंडळ व जीर्णोद्धार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

फोटो : सेलू ( जि.परभणी ) येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरातील श्री व्यंकटेशाची मूर्ती.

पूर्ण...

No comments:

Post a comment