तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 18 November 2019

पाथरी श्रीसाईबाबा जन्मभूमी ते शिर्डी कर्मभूमी बस सेवा सुरूकिरण घुंबरे पाटील
पाथरी:-गेली अनेक वर्षा पासून पाथरी ते शिर्डी अशी थेट बस सेवा सुरू व्हावी ज्या मुळे श्रीसाईबाबांच्या भक्तांना ये-जा साेईची हाेईल अशी मागणी हाेत हाेती अनेकदा या साठी प्रयत्न झाले.पाथरी आगाराने आणि श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर ट्रस्टने या साठी वरीष्ठां कडे सतत पाठपुरावा केल्याने अखेर मंगळवार १९ नाेव्हेंबर पासून पाथरी आगारातून बस सेवेला सुरूवात झाली असुन सकाळी सात वाजता जेष्ठ चालक विठ्ठल तात्याराव कांडके यांच्या हस्ते विधिवत पुजन करून पाथरी ते शिर्डी या श्रीसाईबाबा जन्मभूमी ते कर्मभूमी अशी बस सेवा सुरू झाली आहे.
या वेळी पाथरी आगार प्रमुख पी पी पानझडे वाहतुक नियंत्रक प्रल्हाद सुरवसे, भाेकरे, चालक भिसे, वाहक पुरी, श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिराचे विश्वस्थ अॅड अतुल चाैधरी, काेषाध्यक्ष सुर्यभान सांगडे, मुख्यकार्यकारी अधिकारी नारायणराव कुलकर्णी पुजारी याेगेश इनामदार, प्रभाकर पाटील, काळे मामा आणि प्रवाशांची उपस्थिती हाेती. या वेळी बाेलतांना आगार प्रमुख पानझडे म्हणाले की ही बस सेवा अखंडपणे सुरू ठेवण्याचे आमचे प्रयत्न राहातील पाथरी येथून सकाळी साडे सहा वाजता ही बस शिर्डी साठी रवाना हाेईल. साधारणत: दुपारी दिड दाेनच्या सुमारास शिर्डी ला पाेहचेल या बस सेवे मुळे शिर्डी हून पाथरी आणि पाथरी हून शिर्डी साठी थेट ये जा करणे आता भक्तांना साेईचे हाेणार आहे. ही बस पाथरी,माजलगाव, गेवराई,शेवगांव, नेवासा,शिर्डी मार्गे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी या आगाराचे जेष्ट चालक विठ्ठल तात्याराव कांडके यांच्या हस्ते विधिवत पुजन करून या शुभारंभाच्या बस चे फित कापून उदघाटन करण्यात आले. या वेळी श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर समितीचे विश्वस्थ अॅड अतुल चाैधरी यांच्या हस्ते कांडके,चालक भिसे,  वाहक पुरी यांचा शालश्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या बसचा जास्तित जास्त प्रवाशी भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन आगारप्रमुख पाणझडे श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर समिती विश्वस्थ अॅड चाैधरी यांनी केले आहे.

पुणे साठी दिवसातून सहा वेळा बस सेवा-आगारप्रमुख

पाथरी आणि परभणी आगारातून पुणे येथे जाण्या साठी सकाळ संध्याकाळ सहा वेळा बस सेवा असून दुर्दवाने या बस साठी प्रवाशी खुप कमी असताता अशी खंत या वेळी आगारप्रमुख पी पी पानझडे यांनी व्यक्त केली. पाथरी आगाराच्या दाेन शिवशाही वातानुकुलीत बस सेवा सकाळी सात आणि रात्री सात वाजता सुरू आहेत. तर परभणी आगाराची पुणे साठी सकाळी आठ,नऊ तसेच रात्री आठ,नऊ वाजता सुरू आहेत. पाथरीतून जाणारी बस मानवत येथून साेडण्यात येते असे ही पानझडे म्हणाले. एस टी बसचा प्रवास सुखकर असतांना प्रवाशी बसस्थानका बाहेर खाजगी बसची वाट पहात रात्री उशिरा पर्यंत थांबतात अनेकांना आपल्या आगाराची आरामदाई आणि सुरक्षित प्रवास सेवा असल्याची माहिती नाही. प्रवाशांनी याही बस सेवांचा जास्तितजास्त संखेने लाभ घेण्याचे आवाहन नव्यानेच आगार प्रमुख म्हणून रुजू झालेले पी पी पानझडे यांनी केले आहे.

No comments:

Post a comment