तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 November 2019

वैकुंठ चतुर्दशी निमित्त बीड चे किर्तनकार ह.भ.प महादेव महाराज राऊत यांचे सुमधुर वाणीतून कीर्तनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- येथील श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्यावतीने वैकुंठ चतुर्दशी निमित्त बीड चे किर्तनकार  ह.भ.प महादेव महाराज राऊत यांचे सुमधुर वाणीतून कीर्तन रविवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात ते दहा वाजण्याच्या दरम्यान ठेवण्यात  आले आहे .   हे कीर्तन श्री वैजनाथ मंदिराच्या उत्तर बाजूस पायऱ्यावर होणार आहे . या वेळी मृदंगाचार्य ह भ .प .गणेश महाराज उखळीकर हे मृदंगाची साथ देतील .या कार्यक्रमास उपस्थित राहवूनभाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष ,परळी चे तहसीलदार  बिपीन पाटील व सचिव राजेश देशमुख यांच्या सह  सर्व विश्वस्तांनी केले आहे. वैकुंठ चतुर्दशी  निमित्त भगवान शंकर व भगवान विष्णु यांची पौराणिक हरिहर तीर्थावर  गळाभेट मध्यरात्री होते. या मुळे प्रभू वैद्यनाथा च्या पिंडीवर वर्षात फक्त एकदाच  मध्यरात्री तुळशी मंजुळा अर्पण करता येते.हरीहर तीर्थातिल  विष्णू मंदिरात  दर्शन घेऊन भाविक वैद्यनाथा च्या दर्शनासाठी येतात  .वैकुंठ  चतुर्दशी निमित्त श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्यावतीने गेल्या दोन वर्षापासून कीर्तन सेवा सुरू केली आहे , या पूर्वी दोन वर्षात वैकुंठ   चतुर्दशी  दिवशी नामवंत कीर्तनकार उमेश महाराज दशरथे, बाळू महाराज गिरगावकर  यांचे कीर्तन ठेवून भाविकांना  सुमधुर वाणीचा लाभ मिळवून दिला आहे.

No comments:

Post a comment