तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 November 2019

मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रचंड लूट
शेतकऱ्यानि रक्ताचे पाणी करून पिकवलेल्या मालाला व्यापारी म्हणतात घाण

-आडते आणि खरेदीदारांची मनमानी, विनोद बोरेंच्या आंदोलनाला शेतकर्‍यांचा पाठिंबा
-शेतकऱ्यांनी दिला कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकास निवेदन.


मेहकर, ता. २८:-  मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रचंड लूट सुरू असून, याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शेतकर्‍यांनी घाम गाळून पिकविलेल्या सोयाबीन या पिकाचे आठ ते दहा ग्रेड पाडल्या जात आहेत. यामध्ये प्रत्येक ग्रेडचे वेगवेगळे भाव ठरवून शेतकर्‍यांचा जीव घेण्याचा प्रकार दिवसाढवळ्या सुरू आहे. पत्रकार व शेतकरी विनोद बोरे यांनी आज सोयाबिनचे 15 पोते आणले असता त्यांची सोयाबीन एम 5 ग्रेडमध्ये टाकण्यात आली. ज्या सोयाबीनला 3700 पर्यंत भाव मिळाला पाहिजे होता, त्याच मालाला 3435रुपये भाव देण्यात आला आहे. विशेष महत्वाची बाब म्हणजे एम 4 या ग्रेडला 3775 प्रती क्विंटल भाव देण्यात आला आहे. दोन ग्रेडमधील फरक हा फार झाला तर शंभर ते दीडशे  रुपये असतो, पण येथे साडेतीनशे रुपयांचा स्पष्ट फरक दिसत आहे. आडते विजय तोष्णीवाल आणि संबंधित खरेदीदाराने शेतकर्‍यांची लूट थांबवावी, यासाठी शेतकर्‍यांंनी 'बळीराजा वाचवा' अशा घोषणा दिल्या. विनोद बोरे यांनी पुकारलेल्या आंदोलनाला शेतकर्‍यांनी दिलेला प्रतिसाद पाहून आडते आणि खरेदीदार चांगलेच भांबावून. 

:-- आडत्याच्या हमालाला 20 रुपये पोते आणि ढेर टाकण्यासह 30 रुपये देऊनही मालाची सांडसूंड बंद झालेली नाही. आडतेसुद्धा याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

:-- सीसीटीव्ही कॅमेरे तीन-चार महिन्यांपासून बंद

येथील काही आडतमधील सीसीटीव्ही कॅमेरे गत तीन ते चार महिन्यांपासून बंद आहेत.

भूमिहीन हमालसुद्धा शेतमालाचे मालक होत असल्याचा प्रकार सुरू आहे. शेतमाल सांडून दिवसाला दोन पोतेचे मालक हमाल होत आहेत. हा प्रकार सर्वजण पाहू शकता.रक्ताचे पाणी करून पीकवलेल्या मालाला व्यापारी घाण म्हणून संबोधतात 
   या सर्व समस्या निवारण करण्या साठी मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती मेहकर येथे शेतकऱ्यांनी एक निवेदन दिले आणि लवकरात लवकर  समस्या सोडवण्याची  मागणी केली.

No comments:

Post a comment