तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 4 November 2019

एक पाझार तलाव फुटला तर एक पाझार तलाव फुटण्याची भीती !


मेहकर तालुक्यातील ग्राम चिंचोली बोरे येथील गावाच्या पूर्वेकडील असलेला पाझर तलाव फुटला तर पश्चिमेस असलेल्या पाझर तलावाच्या तोंडाजवळून पाणी झिरपत असल्याने गावात भितीच वातावरण.
. जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या अभियंत्याने केली पाहणी पाझर तलाव धोका.

मेहकर :- मेहकर व लोणार तालुक्यात मागील काही दिवसा पासून परतीच्या पावसाने कहर केला अश्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले शेती खरडून गेली,पिकाच्या सुड्या वाहून गेल्या काही ठिकाणी घराची पडझड झाली तर दुसरीकडे अत्ता पाझर तलावाने झोप मोडल्याच पाहायला मिळत आहे अश्यातच मेहकर तालुक्यातील चिंचोली बोरे येथील येथील एक पाझर तलाव २ नव्हेम्बरच्या रात्रि फुटला तर दूसरा फुटनयाच्या भीतिने गावकारी भयग्रस्त झाले. मेहकर पासून जवळच असलेल्या १७०० च्या जवळपास लोकसंख्या असलेला ग्राम चिंचोली बोरे येथे दोन पाझार तलाव आहेत यात एक पाझार तलाव गावाच्या जवळील शासकीय जमिनीवर सुल्तानपूर च्या दिशेने जलसंधारण या विभागाच्या अंतर्गत सहा महिन्या अगोदर बांधून पूर्ण झाला आणि २ नव्हेम्बरच्या रात्रि फुटला हा पाझर गावातील झोपड़ पट्टी परिसरात होता मात्र दैव बलवत्तर म्हणून या परिसरात पाणी शिरले नाही आणि मोठी दुर्घटना टळली तर गावाच्या पश्चिमेस दोन वर्षांपूर्वी पूर्णत्वास आलेला एक पाझर तलाव आहे हा पाझर तलाव तुडुंब भरलेला असून त्याच्या भिंती मधून पाणी पाझरत असल्याने गेल्या दोन दिवसा पासून चिंचोली बोरे वासीं भीतीच्या सावटे खाली वावरत आहेत अश्यातच दुसरीकडे याची माहिती वेळो वेळी जिल्हा परिषद सिंचन विभागाला दिल्या नंतर देखील त्यांनी कोणतीच दखल घेतलेली नाही २ आक्टोम्बरच्या रात्रि एक पाझर तलाव फुटल्याने गावातील लोकांच्या मनात धस्ति निर्माण झाली अश्यात गवाच्या पूर्वेकड़े असणारे पाझर तलाव फुटल्यावर गावत जीवितहानी होउ शकते.
(जिल्हा परिषदच्या सिंचन विभागाच्या शाखा अभियंता ए एच जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी सांगितले की आम्ही चिंचोली बोरे येथील पाझार तलाव बघितले त्यातील फुटलेला पाझार तलाव आमच्या अख्त्यारित येत नाही व दूसरा पाझर तलाव धोका दायक पातळीत नाही त्याचा सांडवा सुद्धा सुरळीत वाहत आहे तेव्हा
नागरिकांनी भीती बाळगू नये)

 (गावाच्या पश्चिमेला असणारे पाझर तलाव तुडुंब भरलेले असून कित्येक ठिकाणी त्याला पाझर फुटलेले आहेत तेव्हा संबंधित विभागाने यावर त्वरित उपाय योजना करावी गावकरी भीतीच्या सवटेखाली आहे यावर तज्ज्ञांना आणून पाझर तलावाची तपासणी करावी प्रकाश बोरे चिंचोली वासीं)


जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment