तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 November 2019

क्रांतीवर लहुजी साळवे जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा- मातंग समाजाची मागणी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
    भारतीय स्वातंत्र्याचे आद्यजनक, महात्मा फुले यांचे गुरु, बळवंत फडके, लोमान्य टिळक यांना सशस्त्र लढाचे धडे देणारे, जगेन तर देशासाठी... मरेन तर देशासाठी... अशी सिंह गर्जना करुन इंग्रजाना सळो की पळो केले व भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पन केला अशा महान क्रांतीवर लहुजी साळवे यांच्या जयंती दिनी 14 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली. तशा प्रकारचे निवेदन मातंग समाजाचे कार्यकर्ते सर्वश्री के. डी. उपाडे, रामचंद्र वाघमारे, रमेश मस्के, डी.जी. मस्के, दशरथ आरगडे, नाना कसबे, निलेश सगट, पवन कांबळे इत्यादींनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:

Post a comment