तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 26 November 2019

मंगरुळपीर येथे भारतीय संविधान दिन साजरा


फुलचंद भगत
वाशिम- जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण करून झाली.
रॅलिमधील बौध्द अनुयायांना साळुंकाबाई बहुऊद्देशीय संस्था व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती या संस्थेकडुन चहाबिस्किटचे वितरण करन्यात आले.
मंगरुळपीर येथील महिलामंडळांनी एकञृ येवुन जगविख्यात असलेल्या भारतीय संविधानाचे महत्व लोकांना कळावे आणी भारतीय संविधान घराघरात पोहचावे या ऊदात्त हेतुने शहरातुन संविधान रॅलिचे आयोजन केले होते. मान्यवरांनी भारतीय संविधान दिनाबद्दल माहिती दिली.
भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा  आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून राज्यघटना अंमलात आली. १९५० साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५च्या भारत सरकार कायद्यावर  वर आधारित आहे. ऑगस्ट २९- १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस “भारतीय संविधान दिन” म्हणून साजरा केला जातो.नागरिकत्व, निवडणूका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने जानेवारी २६ १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस “भारतीय प्रजासत्ताक दिन” म्हणून साजरा केला जातो.भारताची राज्यघटना उद्देशिका  मुख्य भाग व १२ पुरवण्या अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे २२ विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरूवातीच्या ३९५ कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत.सध्या राज्यघटनेत ४४८कलमे  असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते.भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम  , समाजवादी  धर्मनिरपेक्ष , लोकशाही प्रजासत्ताक आहे. मूळ उद्देशिकेत समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द नव्हते. राज्यघटनेच्या ४२व्या दुरूस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले. अशी माहिती मान्यवरांनी सांगीतली. 
विद्यार्थ्यांनी भारतीय भारतीय संविधान दिनाबद्दल आपली मनोगते व्यक्त केली.अशोकनगर येथील झेंड्याजवळ सर्व महिला मंडळी एकञ येवुन तसेच बौध्द ऊपासक आणी ऊपासिका यांनी एकञ जमुन नंतर रॅलीला सुरुवात केली.मंगरुळपीर शहरातील मुख्य चौकातुन ही रॅली काढुन शेवटी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हारार्पन आणी वंदना घेवुन समारोप करन्यात आला.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

No comments:

Post a comment